Horoscope Today, 17 january 2023: कन्या अन् मीन राशीच्या लोकांना मिळेल यश, जाणून घ्या इतर राशीतील लोकांच्या नशिबी आहे काय?

Horoscope Today, 17 January 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

 Horoscope Today, 17 january 2023
जाणून घ्या 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मकर राशीत शनीच्या संक्रमणामुळे नोकरीत वाद होऊ शकतात.
  • शुक्र आणि शनि नवव्या घरात असल्यामुळे नशिबात यश मिळवून देतील.
  • नोकरी मिळण्यासह आज काहींना आर्थिक मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope Today, 17 january 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस? (Daily Horoscope, Today's, 17 january 2023 Horoscope in Marathi)

अधिक वाचा  : केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्ह आणि नावासाठी सुनावणी

 1.मेष

आज तुमचे मन खूप विचलित राहू शकते, यासाठी ध्यान आणि योगासने करा. तर या राशीच्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.तर राजकारण्यांना लाभ होईल. या राशीच्या लोकांसाठी पांढरा आणि लाल रंग शुभ राहणार आहे. 

 2.वृषभ

शुक्र आणि शनि नवव्या घरात असल्यामुळे नशिबात यश मिळवून देतील. सूर्यही नवव्या घरात आहे. तसेच या राशीतील लोकांचा व्यवसाय असेल तर त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.बृहस्पति लाभदायक आहे, पण मकर राशीत शनीच्या संक्रमणामुळे नोकरीत वाद होऊ शकतात. आज केशरी आणि हिरवा रंग शुभ असेल. 
 
अधिक वाचा  : सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून कोहली चार शतकं लांब

3.मिथुन

 मकर राशीत शुक्राचे संक्रमण असल्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.आज तुमच्यासाठी  निळा आणि आकाशी रंग शुभ असेल. तर वैवाहिक जीवन आनंदी राहील.

4.कर्क

या राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे खूप चांगला असेल. आजचा दिवस हा शिक्षणात यश मिळवून देणारा आहे. शिक्षण, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोक त्यांच्या करिअरबद्दल उत्साही आणि आनंदी राहतील. आज या राशीच्या जातकांसाठी आकाशी आणि हिरवा रंग शुभ राहील. 

5.सिंह

दुपारनंतर चतुर्थ भावात चंद्राचे भ्रमण व्यवसाय आणि नोकरीत यश देईल. बेलाचे वृक्ष लावाल तर आर्थिक सुखात वाढ होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.लाल आणि पिवळा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. 

6.कन्या

नोकरीत कार्यालयीन कामात प्रगती झाल्याने आनंदी राहाल. शुक्र ग्रह हा  चित्रपट आणि बँकिंग नोकरीत यश देऊ शकतो. यासाठी गुरूचे आशीर्वाद घेतले पाहिजे. नोकरी मिळण्यासह आज काहींना आर्थिक मिळण्याची शक्यता आहे. आज नारंगी आणि पिवळा रंग शुभ आहे. 

अधिक वाचा  : दानवेंचं नाव असलेला तीस-तीस घोटाळा आहे तरी काय

7.तुळ 

सूर्य आणि शुक्र आता येथून चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. व्यवसायातील  प्रगतीबद्दल आनंद होईल. आर्थिक आनंद वाढविण्यासाठी श्री सूक्ताचे पठण करा. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला आशावादी बनवेल. आजसाठी निळा रंग आणि केसरी रंग शुभ राहील. 

8.वृश्चिक

 आज राजकारणात यश मिळेल. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. आज या राशीच्या लोकांसाठी केशरी आणि लाल रंग शुभ आहेत. शुक्र मकर राशीत राहिल्याने प्रेम जीवन सुधारेल.

9.धनु

या राशीतील दुसरा शनि, सूर्य आणि शुक्र हे एकत्र असल्याने ते नोकरीसाठी खूप शुभ आहेत. नोकरीतील बढतीबाबत चांगली बातमी मिळेल. व्यवसायात यश मिळण्याची चिन्हे आहेत. या राशींच्या लोकांसाठी आज गुलाबी रंग शुभ राहील. 

अधिक वाचा  : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत बाबरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

10.मकर

शुक्र आणि सूर्य शनीच्या या राशीत राहून लाभ देतील. चंद्र आणि बुधाच्या संक्रमणामुळे मीडिया,आयटी आणि बँकिंगच्या नोकरीत फायदा होऊ शकतो.तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने लाभ मिळेल. आज पांढरा रंग शुभ असेल. 

11.कुंभ

व्यवसायात यश मिळवण्यासाठी आज श्रीसूक्ताचे पठण करा. नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. तुम्ही कुठे प्रवास करत असाल तर तो सुखकर होईल. या राशीच्या लोकांसाठी निळा रंग शुभ राहील. 

12. मीन 

 या राशीचा स्वामी गुरू तुम्हाला धार्मिक कार्यात व्यस्त ठेवेल. व्यवसायात यश मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीत कन्या राशीच्या उच्च अधिकार्‍यांमुळे तुम्हाला आनंद होईल. आज या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग आणि पांढरा रंग शुभ राहील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी