Horoscope Today, 18 january 2023 : धनु आणि कुंभ राशीसाठी आजचा दिवस असेल लकी डे; जाणून घ्या इतर राशींचं कसं असेल भविष्य

Horoscope Today, 18 January 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Horoscope Today, 18 january 2023
Horoscope Today : जाणून घ्या इतर राशींचं कसं असेल भविष्य   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज बुधवारचा दिवस धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे.
  • कुंभ राशीमधील काहीजण वाहन किंवा जमीन खरेदी करू शकतात.
  • ोकरदार लोकांना नोकरीत प्रगती पहायला मिळेल.

आज बुधवारचा दिवस धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज धनु राशीच्या लोकांना त्यांचे रखडलेले पैसे मिळू शकतात. तर कुंभ राशीमधील काहीजण वाहन किंवा जमीन खरेदी करू शकतात. याप्रमाणे इतर राशींच्या लोकांचे भाग्य कसे असेल हे जाणून घ्या.  (daily horoscope todays 18 january 2023 horoscope in marathi)
अधिक वाचा  :  Winters Ladoo : थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू

1.मेष

आज दशमस्थानी असलेला सूर्य आणि शुक्र तसेच अष्टमस्थानातील चंद्र द्वादशमधील गुरू नोकरीमध्ये मोठा फायदा करून देणार आहे. जर तुमचा व्यवसाय हा पार्टनरशीपमध्ये असेल तर त्यात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे . नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. आज लाल रंग आणि केसरी रंग तुमच्यासाठी शुभ असेल. 
 
2.वृषभ 

आजचा दिवस या राशीच्या लोकांना यश मिळवून देणारा आहे. तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल. आज निळा आणि पांढरा रंभ शुभ असेल. 

अधिक वाचा  :  मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत बाबरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

3.मिथुन

अष्टमी स्थानी असलेले सूर्य-शुक्र हे आरोग्यासाठी शुभ आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगती पहायला मिळेल. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. हिरवा आणि आकाशी रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. 

4.कर्क

या राशीमधील काही लोक हे धार्मिक कार्यात व्यस्त असतील.  तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल आणि इतरांनाही मदत कराल. नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी आनंदी रहतील. आजचा शुभ रंग आकाशी आणि हिरवा आहे. 

अधिक वाचा  :  Mangalwar Upay : मंगळवारचे उपाय, हनुमानाची कृपा राहील


5.सिंह

अष्टमी स्थानावरील गुरू आणि सुर्य-शुक्र या राशीच्या खष्ठम घरात राहतील. शुक्र आणि बुध नोकरीमध्ये नवीन जबाबदारीचा फायदा होईल. जर कोणी तुमच्याकडे आज नव्या व्यवसायाची कल्पना घेऊन आला असेल तर त्याला नाही म्हणू नका. आज राशीसाठी केशरी आणि आकाशी रंग शुभ आहे. 

 
6.कन्या
 

या राशीतील  सूर्य-शुक्र पाचव्या स्थानावर राहून विद्यार्थ्यांना लाभ देतील.  सप्तम गुरु आणि पाचवा शुक्र लव्ह लाईफसाठी फायदेशीर आहे.  शनि देखील शुभ आहे जो राजकारणात यश देईल. आज या राशीसाठी  निळा रंग शुभ आहे. 
 अधिक वाचा  :  धनुष्यबाण नेमकं कोणाच्या हाती? निवडणूक आयोगात काय घडलं? वाचा


7.तुळ


तुम्ही अधिक तणाव आणि चिंतेने त्रास्त होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या आरोग्यातही चढ-उतार होईल. तुम्हाला धावपळही करावी लागू शकते.  आज या राशीसाठी निळा आणि लाल रंग शुभ आहेत.

8.वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज काहीतरी खास करण्याची घाई होणार आहे. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज कोणत्याही सरकारी संस्थेकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या  चंद्र प्रेम आणि इतर नात्यांमध्ये भावनिकता निर्माण करेल. आज नारंगी आणि पिवळा रंग शुभ असेल. 

 अधिक वाचा  :   धुळे शहरातील मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला

9.धनु

सूर्य शुक्र आणि शनि मकर राशीत आहेत. आज चंद्र बाराव्या घरात भ्रमण करत आहे. या राशीवर शनीची साडेसती देखील आहे. कुटुंबातील मुलांच्या विवाहाबाबत चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत. 

10 .मकर 

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीत प्रगती होईल. शिक्षणात यश मिळेल.नोकरीमध्ये कोणताही निर्णय घेताना गोंधळात पडण्याची शक्यता आहे. आज या राशीच्या लोकांसाठी जांभळा आणि हिरवा रंग शुभ आहे.

11. कुंभ 

कौटुंबिक जीवनात आनंद दिसून येईल. व्यवसायात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन गोष्टींची सुरुवात होण्याची शक्यता आहे. सूर्य किंवा शुक्र द्वादश तुम्हाला लाभ देईल. आजचा दिवसासाठी निळा आणि पांढरा रंग शुभ असेल. 

12. मीन

राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.  या राशीतील लोक जर आज घर घेणार असतील तर आजचा दिवस चांगला आहे. काही लोक धार्मिक कार्यात व्यस्त राहतील. आज केशरी आणि पांढरा रंग शुभ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी