Horoscope Today, 07 March 2023: आनंदमयी असेल धुलिवंदनचा दिवस; वृषभ,कर्क राशीसह या राशींवर असेल लक्ष्मीचा आशीर्वाद

Horoscope Today 7 March 2023: फाल्गुन पूर्णिमा (Falgun Purnima) च्या दिवशी धुलिवंदन खेळले जाते. हा आजचा दिवस राशीचक्रातील 12 राशींसाठी चांगला असेल. तर वृषभ, कर्क, या राशींवर लक्ष्मी मातेची कृपा अधिक असेल. कोणत्या राशींच्या लोकांनी आज काय दक्षता घ्यायची आहे याचे राशीभविष्य आपण जाणून घेऊ... 

Daily Horoscope, tuesday 07 March 2023 Horoscope
आनंदमयी असेल धुलिवंदनचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जचा दिवस राशीचक्रातील 12 राशींसाठी चांगला असेल.
  • जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल.
  • मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक कारणांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा असेल.

Horoscope Today 7 March 2023: फाल्गुन पूर्णिमा (Falgun Purnima) च्या दिवशी धुलिवंदन खेळले जाते. हा आजचा दिवस राशीचक्रातील 12 राशींसाठी चांगला असेल. तर वृषभ, कर्क, या राशींवर लक्ष्मी मातेची कृपा अधिक असेल. कोणत्या राशींच्या लोकांनी आज काय दक्षता घ्यायची आहे याचे राशीभविष्य आपण जाणून घेऊ... (Daily Horoscope, tuesday 07 March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi)

अधिक वाचा  : रिलेशनशिपमध्ये या गोष्टी कधीच खपवून घ्यायच्या नाहीत

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक कारणांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा असेल. आता हळू हळू तुमचे नशीब तुमच्या सोबत असेल. तुम्ही कोणतेही नवीन काम केल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल. तर काही लोकांचा अडकलेला पैसा आज मिळेल, तर काहींचा आज प्रवास योग आहे.  शुभ रंग - नारंगी

अधिक वाचा  : लग्नानंतर तुमचे हे बदलले का? मग हे असेल कारण

वृषभ

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. नाहीतर घेण्याचे देणे होईल.  काही लोकांच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. परंतु जर तुम्हाला एखाद्यासोबत पैशाचे व्यवहार करायचे असतील तर ते काळजीपूर्वक करा. शुभ रंग - लाल

मिथुन 

या राशीतील काही लोकांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर तुमचे वडील त्यात हस्तक्षेप करत तुम्हाला मदत करतील. तर व्यवसाय करणाऱ्या अनेकांना त्यांच्या वडिलांची मदत मिळेल. विवाहित लोकांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाईल.  शुभ रंग - जांभळा 

अधिक वाचा  : डिजिटल मार्केटिंगमध्ये असं बनवा आपलं करिअर

कर्क 

या राशीसाठी आजचा दिवस हा साधारण असेल. परंतु कुटुंबातील व्यक्तींसाठी काहीसा पैसा खर्च कराल. या राशीतील काही लोकांच्या घरी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. तर जे व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना त्यांचा फायदा नक्कीच मिळेल. शुभ रंग-हिरवा

सिंह 

या राशीतील जे लोक व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या कामची चिंता आज राहील. गेल्या काही दिवसांपासून काम नियमित चालत नसल्याने तुम्ही आज चिंतेत असाल.  मोठा निर्णय घेत असताना अनेकांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळेल. शुभ रंग-  पिवळा

कन्या 

या राशीतील अनेकाना त्यांच्या कामासाठी धावपळ करावी लागेल. परंतु ही धावपळ त्यांच्यासाठी लाभ देणारी असेल. नोकरीच्या क्षेत्रात पद आणि मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. शुभ रंग  - लाल

अधिक वाचा  : आबा! हाताला नेमकं कधी हळद लावावी?

तुळ

तुळ राशीतील काही लोकांच्या घरात वाद चालू आहेत. हे वाद शांतेत आणि चर्चा करून सोडवावेत. कारण आजचा दिवस खूप चिंताजनक आणि त्रासदायक असेल. शुभ रंग - तपकिरी 

वृश्चिक 

नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल आणि वडिलांच्या आशीर्वादाने आज त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळेल. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांच्या काही योजना या यशस्वी होतील. तर जुने भांडणं हे सुटतील. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्य आज तुमची बाजू घेतली. शुभ रंग - पांढरा

धनु 

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आज बर्‍याच दिवसांनी तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते, येणारा काळही उत्साहाने जाईल. तुमची नवी ओळख तुम्हाला फायदा करून देईल, परंतु आजचा दिवस आर्थिक संबंधी चांगला नाहीये. 

अधिक वाचा  : श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव

मकर 

आज  या राशीतील काही लोक अनेक प्रकारच्या गोंधळामुळे त्रस्त असतील.  कार्यक्षेत्रातही कामाचा ताण अधिक राहील.  परंतु भावंडांशी संबंध सुधारतील. आजचा दिवस तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी करून घेणार आहे. या दरम्यान तुमचा आदर वाढेल. शुभ रंग - हिरवा

कुंभ 

आज कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होतील. तुमच्या मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल, परंतु तुमच्या वडिलांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधात काही तणाव असू शकतो.  शुभ रंग - गुलाबी 

अधिक वाचा  : मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

मीन 

आज या राशीतील लोकांना पालकांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यामुळे तुम्ही भविष्यात योग्य आणि अचूक निर्णय घेऊ शकतील. लाइफ पार्टनरच्या नवीन व्यवसायात यश मिळेल, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आज चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील. शुभ रंग - भगवा केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी