Horoscope Today, 08 March 2023: महिलांसाठी आजचा दिवस असेल आनंदाचा; तर या राशींसाठी असेल धनलाभ देणारा

आज महिला दिन आहे,आजचा दिवस महिलांसाठी खूप चांगला आहे. परंतु   ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल, कोणत्या राशीच्या लोकांना​ नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना​ तोटा होईल, कोणत्या राशीच्या लोकांना करिअर संबंधी नवीन संधी मिळतील हे जाणून घेऊ.

Horoscope Today, 08 March 2023
जाणून घ्या महिलादिनचं राशीभविष्य; कसा असेल आजचा दिवस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या बुधवारचं कसं असेल भविष्य
  • कोणत्या राशीच्या लोकांना​ नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना​ तोटा होईल
  • महिलासांठी आजचा दिवस असेल आनंदाचा

Horoscope Today, 08 March 2023: आज महिला दिन आहे,आजचा दिवस महिलांसाठी खूप चांगला आहे. परंतु   ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल, कोणत्या राशीच्या लोकांना​ नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना​ तोटा होईल, कोणत्या राशीच्या लोकांना करिअर संबंधी नवीन संधी मिळतील हे जाणून घेऊ. (Daily Horoscope, Wednesday  08 March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi)

मेष  

उद्योग-व्यवसायात चढ-उताराचा अनुभव येणे आवश्यक आहे. वादविवाद टाळा. तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठांशी जास्त वाद घालू नका.  शुभ रंग - लाल

अधिक वाचा  : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुभेच्छा करा शेअर

वृषभ 

आजचा दिवस सामान्य असेल. प्रवासाला जाण्याची योजना तुम्ही करू शकतात. तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला खूश करण्यासाठी खूप मोठी रक्कम खर्च करू शकता. शुभ रंग - नारंगी 

मिथुन 

मिथुन राशीचे लोक नवीन कामाचा मार्ग अवलंबू शकतात. सर्वात कठीण कार्ये करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी भेटवस्तू आणाल. खर्च होईल पण, घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन समाधान वाटेल.  प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. 

अधिक वाचा  : आंतरराष्ट्रीय महिला दिनी माई, ताईला द्या शुभेच्छा

कर्क 

कर्क राशीच्या लोकांवर कामाचा भार अधिक असणार आहे. आपण पूर्ण आनंद घेऊ शकणार नाही. तुमचे लक्ष तुमचे काम पूर्ण करण्यावर असेल.  आज नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्ना आज पासून वाढ होऊ शकते.  शुभ रंग -हिरवा

सिंह 

आज तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राइज देऊ शकतो.  या राशीतील जे व्यक्ती व्यवसाय करत असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतील. कमाईचे नवीन मार्ग मिळू शकतील.  तर काहींना टीकेचा सामना करावा लागेल. शुभ रंग - 
पांढरा

अधिक वाचा  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे शुभेच्छा संदेश

कन्या 

कोणतीही शंका आणि विचार न करता तुमच्या कर्तव्यात व्यस्त राहणार.  या राशीतील व्यवसायिकांना व्यापाराच्या नवीन संधी मिळतील. पती- पत्नी आपले कर्तव्य समजून कामे करतील.  आज आराम मिळण्याची शक्यता आहे.  शुभ रंग - निळा

तुळ

आजचा दिवस महिलासांठी चांगला आहे. परंतु काही लोकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज शिवीगाळ करू नका. आज घरची दैनंदिन कामेही काही अडचणीनंतरच पूर्ण होतील. बराच काळ व्यापार-व्यवसायाची परिस्थितीही नाजूक आहे. व्यवसाय क्षेत्रातील चढ-उतार केवळ तुमच्यासाठीच नाहीत हे लक्षात ठेवा. शुभ रंग - जांभळा

अधिक वाचा  : ब्रा न घातल्याने होतं मोठं नुकसान


वृश्चिक 

अनेकवेळा तुम्ही इच्छा नसतानाही अशा ठिकाणी अडकता, ज्यातून बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. नवविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे, त्यांचे नाते घट्ट होईल. आज महत्त्वाची कामे पूर्ण करा.  शुभ रंग - आकाशी 

धनु

या राशीतील काही लोकांच्या घरी वादाचे वातावरण राहील. तर अविवाहित व्यक्ती जर आपला जीवनसाथीदार शोधत असतील तर काळजीपूर्वक त्याची निवड करावी. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

अधिक वाचा : रिलेशनशिपमध्ये या गोष्टी कधीच खपवून घ्यायच्या नाहीत

मकर 

या राशीतील लोक गुतंवणूक करण्याचा विचार करत असतील तर आज करू नका.  या राशीतील महिलांचा आजचा दिवस चांगला असेल.  आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  शुभ रंग  - लाल 

कुंभ 

आज आराम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची ही वेळ आहे, मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल तर कष्ट करणे कठीण होईल. परंतु या राशीतील महिलांसाठी आजचा दिवस सन्मान देणारा असेल. त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा  : लग्नानंतर तुमचे हे बदलले का? मग हे असेल कारण

मीन

व्यापारी लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, आज नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. तर महिलांसाठी आजचा दिवस हा आत्मसन्मान मिळवून देणारा असेल. प्रेमी लोकांसाठी बुधवारचा दिवस भारी जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी