Daily Horoscope 15 March 2023 : मेषसह दोन राशींना बुधवार धन लाभासाठी ठरेल लकी Day;जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Daily Horoscope 15 March 2023 : बुधवार 15 मार्च हा दिवस काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांना आज अधिकचे कष्ट करावे लागतील. तर मेष, आणि कुभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा यश मिळवून देणारा असेल. जर इतर राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ

Daily Horoscope 15 March 2023
मेषसह दोन राशींना बुधवार धन लाभासाठी ठरेल लकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बुधवार 15 मार्च हा दिवस काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे.
  • मेष, आणि कुभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा यश मिळवून देणारा असेल.
  • जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल?

Daily Horoscope 15 March 2023 : बुधवार 15 मार्च हा दिवस काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांना आज अधिकचे कष्ट करावे लागतील. तर मेष, आणि कुभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा यश मिळवून देणारा असेल. जर इतर राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ.. (Daily Horoscope, Wednesday 15 March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi)

अधिक वाचा  : काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा


 
 मेष 

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मिश्रित असेल. अनेक प्रकरणे तुम्हाला एकट्याला सोडावावी लागतील. आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या विरुद्धातील लोकं आर्थिक मदत करतील. शुभ रंग - लाल 


वृषभ

आज या राशीतील लोकांना त्यांच्या कामात काहीशा अडचणी येऊ शकतात. आज अनेकांची कामे वाढणार आहेत. पण जर तुम्ही योजना बनवून काम केलं तर कामातील अडचणी दूर करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. शुभ रंग - पांढरा 

अधिक वाचा  : दात न घासता पाणी प्या, हे होतील फायदे

मिथुन

मिथुन राशीतील लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज काही लोक आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी विचार करण्यात आपला वेळ घालवतील. आज तुम्ही कुठे प्रवास करत असाल तर आपले सामान नीट संभाळून ठेवा, वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. शुभ रंग - राखाडी 


कर्क 

या राशीतील काही व्यक्ती आज खूप व्यस्त असतील. अनेक कार्यक्रमाचे आमंत्रण अनेकांना मिळण्याची शक्यता आहे. आज काही लोकांना कामानिमित्त प्रवास करण्याचा योग येऊ शकतो. तुमचं काम करण्यासाठी अनेकांशी संपर्क करावा लागेल. तर काही लोकांना आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा  : स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ

सिंह 

आज बुधवारचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी व्यस्त असेल. तर ज्या लोकांचा पैसा अडकला असेल त्यांना त्याचा पैसा परत मिळेल. तर आजचा दिवस काहींसाठी कंटाळवाणा असेल. नशीब चमकावे यासाठी तुम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागेल. शुभ रंग - आकाशी 

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज त्यांच्या कुटुंबियांकडून अनेक कामात  पाठिंबा मिळेल. परंतु ते कोणत्या तरी कारणांमुळे नाराज देखील होतील. जर पैशाचा व्यवहार करणार असाल आजचा दिवस करून नका. या राशीतील काही व्यवसाय करत असतील तर आज त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग- निळा  
अधिक वाचा  : पोरं अभ्यास करत नसतील तर पालकांनो करा या गोष्टी

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अनेकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायक करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा कष्ट देणारा असेल, आर्थिक लाभ देखील संभवतो. कामासाठी किंवा व्यावसायासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. वैवाहिक जोडप्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. 

अधिक वाचा  : असे मित्र शत्रूपेक्षा असतात जास्त धोकादायक, वेळेतच व्हा दूर


वृश्चिक 

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बदल घेऊन येईल. तसेच आज तुम्हाला काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आज काही लोकांचं कामात मन लागणार नाही. यामुळे तुमच्या कामात चुका होई शकतात. आज अनेकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमवीरांनी आज बोलताना काळजी घ्यावी. तर विवाहित लोकांना आजचा दिवस मिश्रश्रित असेल. शुभ रंग - निळा 

अधिक वाचा  : रेल्वे प्रवास करताना मोबाईल चार्ज करा फूल, नाहीतर...

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. आज अनेक लोक आहेत ज्यांना आयुष्य सजवण्याची संधी मिळेल. यामुळे आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. तथापि, आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही, यासाठी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. आपल्या आयुष्यात प्रेमाची वाट पाहणाऱ्या लोकांना अजून वाट पाहवी लागणार आहे. आज प्रेम व्यक्त करत असाल नकार मिळण्याची शक्यता. शुभ रंग - पांढरा 

मकर

मकर राशीतील लोकांना करिअर आणि वैयक्तिक जीवनात संतुलित करावे लागेल.  नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस भारी असणार आहे. आज अनेकांच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. तर व्यावसायिक लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल 

अधिक वाचा  : मुंबई हायकोर्टाचा अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी आज आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जोडीदाराने किंवा शेजाऱ्याने काही बोलले असेल त्यावर तुम्हाला राग येईल, पण तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आज एखाद्याशी भांडणाचा परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून येईल. घरात वातावरण जर तणावपूर्ण असेल. शुभ रंग - राखाडी 

मीन

मीन राशीच्या काही लोकांसाठी आजचा दिवस नोकरीच्या ठिकाणी चांगली कीर्ती मिळवून देणारा आहे. आज गांभीर्याने काम केल्यास प्रगती होईल. काळाचे सहकार्य मिळत राहिले आणि तुमची इच्छाशक्ती अशीच राहिली तर ती वेळ निघून जाणार नाही. तर अनेकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी