Daily Horoscope : नव्या वर्षातील पहिल्या शनिवार १ जानेवारी २०२२ चे राशीभविष्य

Daily Horoscope : शनिवार १ जानेवारी २०२२ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 1 january 2022 daily horoscope
नव्या वर्षातील पहिल्या शनिवार १ जानेवारी २०२२ चे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • नव्या वर्षातील पहिल्या शनिवार १ जानेवारी २०२२ चे राशीभविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 1 january 2022 daily horoscope आजचे राशी भविष्य शुक्रवार १ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. यश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस छान जाईल. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तब्येत जपा. अनावश्यक प्रवास टाळा. बाहेरचे खाणे टाळा. आवश्यक असल्यास विश्रांती घ्या. अतिरेक टाळा. शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: स्वतःला वेळ द्याल. चिंतन कराल आणि चुका सुधाराल तर प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रेम वाढेल. नाती जपाल. लोकांवर प्रभाव पाडाल. शब्द जपून वापरणे फायद्याचे ठरेल. शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील आणि अडचणी दूर होतील. हुशारीने परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मेहनत करावी लागेल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे आणि विचारपूर्वक नियोजन करुन काम करणे हिताचे. चुका सुधाराल तर प्रगती कराल. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य /Libra Horoscope Today: शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे. नियोजनाचा फायदा होईल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: शुभकार्य घडले. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. दिवस आनंदात जाईल. कामं होतील. शुभ रंग - नारिंगी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: हाती पैसा खेळता राहिल्यामुळे मौज करू शकाल. दिवस मजेत जाईल. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: तब्येत ठणठणीत राहील. नवे कार्य हाती घेण्याची इच्छा होईल. नियोजन करुन काम करणे हिताचे राहील. विचारपूर्वक कृती करणे लाभाचे. शुभ रंग - काळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे आणि प्रसंगी नमते घेणे हिताचे. लांबचा विचार करुन नियोजन करणे लाभाचे. संयम प्रगतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. शुभ रंग - तपकिरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. खर्च वाढेल. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी