Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार १५ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, १५ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 15 November 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार १५ नोव्हेंबर २०२१
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
 • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य १५ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 15 november 2021 daily horoscope)

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विचारांची गल्लत करू नका. तज्ज्ञांचा सल्ला लाभाचा ठरेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून कामं करणे हिताचे. माणसं जोडाल तर प्रगती कराल. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग - नारिंगी.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: क्षमता ओळखून कामं करा. हुशारीने कृती करणे लाभाचे. पैसे जपून वापरणे हिताचे. तब्येत सांभाळा.  शुभ रंग - आकाशी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा. प्रामाणिकपणे कष्ट करणे हिताचे. फळाची अपेक्षा न बाळगता कामं करा. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे लाभाचे.  रंग शुभ - मोरपिशी.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: विचारपूर्वक कृती करा. कठीण, गुंतागुंतीची कामं आधी करा. हुशारीने कृती करा. माणसं जोडणं हिताचं. शब्द जपून वापरणं लाभाचं.  शुभ रंग - चंदेरी.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: हट्ट टाळा आणि समजुतदारपणा दाखवा. माणसं जोडणं आणि शब्दांचा सुयोग्य वापर करणं फायद्याचं ठरेल. पैसे जपून वापरणे हिताचे. शुभ रंग - किरमिजी. 
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: पैसे जपून खर्च करणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करणे आणि गुंतवणूक योग्य प्रकारे करणे लाभाचे. वाद टाळा आणि गोड बोला. कामं हुशारीने करणे आवश्यक आहे.  शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: हुशारीने वागणे हिताचे. शांतता आणि संयम लाभदायी ठरेल. आर्थिक नियोजन करा. तब्येत सांभाळा.  शुभ रंग - पांढरा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: धांदल, धावपळ होईल. नियोजन केले तरी थोडी गडबड होईल. डोकं शांत ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे.  शुभ रंग - लाल.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: जो कोणावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला हे लक्षात ठेवून आत्मनिर्भर व्हा. नवनव्या गोष्टी शिकाल तर प्रगती कराल. हुशारीने वागाल तर अडचणींमधून मार्ग काढाल. माणसं जोडाल तर कामं सहज पूर्ण कराल.  शुभ रंग - सोनेरी.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नवं शिकण्याचा योग आहे. कळत-नकळत नव्या क्षेत्रात प्रवेश होईल. हुशारीने वागणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे.  शुभ रंग - जांभळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाईट संगती आणि व्ससनं टाळा. हुशारीने वागणे हिताचे. पैसे आणि तब्येत जपा. कायदा पाळा. वाद टाळा.  शुभ रंग - तपकिरी.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कौतुक होईल, प्रतिष्ठा वाढेल, प्रगती कराल. पाय जमिनीवर ठेवाल तर लाभ होईल. शब्द जपून वापरणे आणि नियोजन करणे हिताचे.   शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी