Daily Horoscope : चंद्रग्रहणाच्या दिवशीचे राशीभविष्य : शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, १९ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

 Daily rashi bhavishaya 19 November 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : चंद्रग्रहणाच्या दिवशीचे राशीभविष्य : शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य १९ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 19 november 2021 daily horoscope)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: जुनी येणी वसूल होतील. दिवस आनंदात जाईल. प्रेमात पडलेल्यांना दिवस छान जाईल. अडचणी दूर होतील आणि प्रगती होईल.  शुभ रंग : गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: निर्णय विचारपूर्वक घ्या आणि हुशारीने कामं करा. माणसं जोडाल तर प्रगती कराल. गोड बोलाल तर फायद्यात राहाल. शुभ रंग : पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. दिवस आनंदात जाईल. शब्द जपून वापराल आणि खर्च विचारपूर्वक कराल तर फायद्यात राहाल. शुभ रंग : मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: संयम महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. वेळ पाहून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती कराल तर फायदा होईल. सावध राहणे हिताचे. शुभ रंग : आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: प्रगती होईल. दिवस बरा जाईल. आव्हान निर्माण झाले तर त्याला हुशारीने सामोरे जा पण घाबराल तर स्वतःचे नुकसान करुन घ्याल हे लक्षात ठेवा. शुभ रंग : किरमिजी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: माणसं ओळखाल तर प्रगती कराल. हुशारीने वागा. शब्द, वेळ आणि पैसा जपून वापरणे हिताचे.  शुभ रंग : मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: हुशारीने वागणे हिताचे. शब्द, वेळ आणि पैसा जपून वापरणे हिताचे. नियोजनावर भर द्या. प्रगती होईल.   शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: ठाम निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेणे महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवून वागाल तर प्रगती कराल. गोड बोला आणि वाद टाळा. माणसं जोडणं आपल्या हिताचे राहील.  शुभ रंग : गुलाबी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रतिष्ठा वाढेल. चांगल्या-वाईटातील फरक ओळखाल तर प्रगती कराल. हुशारीने वागा. वाद टाळणे हिताचे.   शुभ रंग : सोनेरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रसंगी समोरच्याचे ऐकून घ्या आणि समजून घ्या. विचारपूर्वक कृती करणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे.    शुभ रंग : निळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: लेखन क्षेत्रात असलेल्यांना प्रगतीची संधी आहे. दिवस चांगला जाईल. हुशारीने वागाल तर कौतुक होईल.  शुभ रंग : राखाडी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: जुन्या ओळखीतल्यांची पुन्हा भेट होईल. दिवस आनंदात जाईल. अडचणींतून हुशारीने मार्ग काढाल.  शुभ रंग : पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी