Daily Horoscope राशीभविष्य : शनिवार २० नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, २० नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 20 November 2021 daily horoscope
Daily Horoscope राशीभविष्य : शनिवार २० नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope राशीभविष्य : शनिवार २० नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 20 november 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य २० नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: कायदा-नियम यांचे पालन करा. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. संतापावर नियंत्रण राखणे लाभाचे.  शुभ रंग : लाल
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रयत्न सुरू ठेवा यशस्वी व्हाल. कंटाळा कराल तर नुकसान होईल. सातत्य राखणे महत्त्वाचे. शब्द आणि वर्तन याबाबत सावध राहा. चुका टाळा.  शुभ रंग : निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:मेहनतीचे फळ मिळेल. प्रगती होईल आणि कौतुक होईल. बढतीचा योग आहे. नवी जबाबदारी सांभाळताना हुशारी दाखवणे हिताचे.  शुभ रंग : हिरवा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: घरच्यांना आणि ओळखीतल्यांना वेळ द्याल. त्यांच्या सहकार्याने अडचणी सोडवू शकाल. दिवस छान जाईल.  शुभ रंग : चंदेरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: क्षमता ओळखून वर्तन ठेवा. माणसं जोडणं हिताचं. वाद टाळणे आणि गोड बोलून कामं साधणे हिताचे. शुभ रंग : नारिंगी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आश्वासनं देणं टाळा. क्षमता ओळखून वागणे हिताचे. आर्थिक नियोजन हिताचे. इतरांशी जुळवून घेणे हिताचे. शुभ रंग : पोपटी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: चिडचिड करणे टाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. वेळ पाहून निर्णय घ्या. परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. अतिरेक टाळा.   शुभ रंग : निळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: पुरेशी विश्रांती घ्या. तब्येत सांभाळा. हुशारीने वागाल तर फायदा होईल. दिवस चांगला जाईल.  शुभ रंग : लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रगती होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. दिवस आनंदात जाईल. आर्थिक नियोजन हिताचे. वेळ पाळाल तर फायदा होईल.  शुभ रंग : पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  इतरांचे ऐकून घेणे प्रसंगी हिताचे. परिस्थिती पाहून कृती करणे फायद्याचे. गैरसमज करुन घेणे टाळा. संवादातून मार्ग काढणे आणि हुशारीने वागणे हिताचे. शुभ रंग : निळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आत्ममग्न राहणे आणि आत्मप्रौढी करणे टाळा. हुशारीने वागणे, प्रसंगी पुढाकार घेऊन आणि थोडा धोका पत्करुन कृती कराल तर कौतुक होण्याचा योग आहे.  शुभ रंग : काळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तब्येत जपा. उष्णतेचे विकार होण्याचा धोका आहे. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेतल्यास फायदा होईल, अडचणी हळू हळू दूर होतील.   शुभ रंग : पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी