Daily Horoscope : राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१

daily horoscope राशी भविष्य, २१ डिसेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 21 december 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 21 december 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य २१ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. लव लाईफ उत्तम राहील. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. आजचा शुभ रंग : नारंगी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसोबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग : पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग : निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: विवाहित जीवन आनंदीत राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक नियोजन करणं, तुमच्यासाठी योग्य ठरेल. आजचा शुभ रंग : पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कार्यात व्यस्त व्हाल. वायफळ खर्च करणं टाळा. नोकरीत पदोन्नती होईल. नवीन कामाची सुरूवात करू शकता. महत्त्वाचा निर्णय आज घ्याल. आजचा शुभ रंग : हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. लव लाईफ उत्तम राहील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. गृहस्थजीवनात सुख-शांतता राहील. आजचा शुभ रंग : निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: सरकारी कामात यश मिळेल. आयटी आणि बॅंकिंग क्षेत्रात प्रगती होईल. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवाल. विवाहात निर्माण होणारे अडथळे दूर होतील आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग : लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होईल. नोकरीत उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आजचा शुभ रंग : पिवळा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आजचा शुभ रंग : निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. कामा-धंद्यात कठिण परिश्रम करावं लागेल. वैचारिकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. कुटुंबात आनंदीत वातावरण असेल. आजचा शुभ रंग : हिरवा. 
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग : पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी