Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार २९ एप्रिल २०२२; शनि कुंभ राशीत गोचर करणार, काय होणार परिणाम

Daily rashi bhavishaya, 29 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शुक्रवार २९ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

Daily rashi bhavishaya, 29 april 2022 daily horoscope
आजचे राशी भविष्य शुक्रवार २९ एप्रिल २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार २९ एप्रिल २०२२
 • शनि कुंभ राशीत गोचर करणार, काय होणार परिणाम
 • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 29 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शुक्रवार २९ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज शनि कुंभ राशीत गोचर करेल. मेष राशीला 'अच्छे दिन' येण्याची सुरुवात होत आहे. कतृत्वाच्या जोरावर प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल. शुभ रंग - नारिंगी
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कष्ट वाढतील पण आर्थिक लाभ होईल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. मान वाढेल. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा. खर्चांवर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. दिवस बरा जाईल. शुभ रंग - मोरपिशी
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: शनिची ढय्या सुरू झाल्यामुळे तब्येत जपावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. काही अडचणी जाणवतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करावे लागेल. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. शुभ रंग - आकाशी
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: हुशारीने वागा. दादागिरी टाळा. इतरांचेही ऐकण्याची सवय अंगी बाळगा. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. शुभ रंग - गुलाबी
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नेतृत्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल. दिवस चांगला आहे. शुभ रंग - हिरवा
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: हितचिंतकांशी बातचीत करुन निर्णय घेणे हिताचे. आर्थिक नियोजन आणि कामाचे नियोजन करणे लाभाचे. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - आकाशी
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: खर्च वाढण्याची आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियम कायदे पाळणे आवश्यक आहे. दुखापतीचा धोका आहे, काळजी घ्यावी. प्रेमात सावध राहा. लग्न होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. संयम राखा. चुकीच्या मार्गाचा वापर करुन झटपट लाभ मिळविणे टाळा. शुभ रंग - आकाशी
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नेतृत्व करण्याची तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. ही संधी साधून आपण स्वतःचे स्थान आणखी बळकट करू शकाल. लोखंड, तेल, दारू या क्षेत्रांशी संबंधित व्यवसायात असलेल्यांची भरभराट होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. इतरांवर प्रभाव टाकाल. बोलताना शब्द जपून वापरा. शुभ रंग - सोनेरी
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. कायदा नियम पाळा. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. शुभ रंग - काळा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. संघर्ष टाळणे आणि सावध राहणे गरजेचे. दिवस बरा जाईल. शुभ रंग - तपकिरी
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: घरच्यांना आणि जोडीदाराला वेळ देणे, ज्येष्ठांची काळजी घेणे हिताचे. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी