राशी भविष्य १६ नोव्हेंबर : पाहा दिवाळी पाडव्याचा दिवस तुमच्यासाठी कसा

राशी भविष्य, १६ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

 • आज बलिप्रतिपदा, भाऊबीजेचा दिवस
 • दीपावली पाडव्याचा आज दिवस, अभ्यंगस्नान
 • सूर्योदय - सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी ६ वाजता

आजचे राशी भविष्य 16 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: थांबलेली सर्व कामे पूर्ण होतील. धन आगमन होत राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्ती यशस्वी ठरतील. शुभ रंग - पिवळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरी बदलण्याच्या दिशेने पाऊल उचलाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धन आगमन होईल. जोडीदाराचे तुम्हाला कामात सहकार्य लाभेल. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: राजकारणात एखादा मोठा हेतू साध्य होईल. व्यवसायात कोणालाही उधार देऊ नका. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. धन आगमन होण्याची शक्यता. एखादे थांबलेले कार्य पूर्ण होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - पांढरा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आयटी क्षेत्रातील व्यक्तींना दिवस बीझी असेल. लेखन तसेच सिने जगताशी संबंधित व्यक्तींसाठी दिवस भाग्यकारक आहे. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन सुखमय असेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - निळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात होणाऱ्या प्रगतीने समाधानी व्हाल. तरुणांसाठी आजचा दिवस आनंदाचा. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - लाल.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये तुम्ही पार्टनरला वेळ द्याल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. शुभ रंग - पांढरा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: शिक्षण तसेच मीडियाशी संबंधित लोकांना लाभ होतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. लव्ह लाईफमध्ये समस्या सतावणार नाहीत. शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: एखाद्या जुन्या मित्राची मदत होईल. नोकरी, व्यवसायात मिळालेल्या यशाने खुश व्हाल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना लाभ होतील. दाम्पत्य जीवनात आनंद राहील. शुभ रंग - पिवळा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: एखादी भेटवस्तू मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे होतील. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग - पांढरा. 
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यात अडचणी येतील. काळजीपूर्वक वाहन चालवा. नोकरीच्या ठिकाणी खूप काम असेल. वादापासून दूर राहणे चांगले. वैवाहिक जीवन सुखमय असेल. शुभ रंग - हिरवा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकारणी लोकांसाठी दिवस शुभ आहे. धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आयटी, मार्केटिंग तसेच सिनेामाशी संबंधित व्यक्ती यशस्वी ठरतील. शुभ रंग - निळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आयटी, मीडिया क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. श्वसनाचे विकार संभवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी