Vastu Astrology: घरात अन् दारासमोर चप्पल उलटी नका पडू देऊ, नाहीतर होईल मोठं नुकसान

घरात आणि दारासमोर चप्पल उलटी असल्यास आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींनी नेहमी टोकलं असेल, आणि ती चप्पल लगेच सरळ करण्यास सांगितलं असेल. बरोबर ना, ज्येष्ठांच्या सांगण्यावरून आपण लगेच चप्पल सरळ करतो. पण तुम्हाला माहित आहे का की घरात उलट्या चप्पल न असू देण्यामागे काय कारण आहे?

Vastu Astrology
घरात अन् दारापुढे चप्पल का उलटी पडू देत नाहीत?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जर तुम्ही चप्पल आणि बुट उलटे ठेवल्यास किंवा घाईघाईने पायातील पायत्राणे काढताना ते जर उलटे झाले तर घरात लक्ष्मी माता येत नाही.
  • चप्पल आणि शूज घरासमोर किंवा घरात उलटे ठेवल्याने घरात भांडण होऊ शकतात.
  • घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते.

Vastu Tips For Home: नवी दिल्ली :  घरात आणि दारासमोर चप्पल उलटी असल्यास आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींनी नेहमी टोकलं असेल, आणि ती चप्पल लगेच सरळ करण्यास सांगितलं असेल. बरोबर ना, ज्येष्ठांच्या सांगण्यावरून आपण लगेच चप्पल सरळ करतो. पण तुम्हाला माहित आहे का की घरात उलट्या चप्पल न असू देण्यामागे काय कारण आहे? वास्तविक आपला समाज अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्यातील एक म्हणजे चप्पल, बुट उलटे ठेवणे. असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट असतील तर ते ताबडतोब सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि लक्ष्मी मातादेखील नाराज होऊ शकते. त्यामुळेच उलटी असलेली चप्पल ताबडतोब सरळ करण्यास वडीलधारी मंडळी सांगत असतात. परंतु त्यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही.

अनेकदा आपण पाहिलं आहे की चप्पल उलटी झाल्यानंतर ती सरळ करायला सांगितली जाते. जुन्या सभ्यतेनुसार असे मानले जाते की जर तुम्ही चप्पल आणि बुट उलटे ठेवल्यास किंवा घाईघाईने पायातील पायत्राणे काढताना ते जर उलटे झाले तर घरात लक्ष्मी माता येत नाही आणि घरात दारिद्र्य आणि गरिबी येत असते. याशिवाय आजारपण, दु:ख इत्यादी गोष्टी घरात येऊ लागतात. त्यामुळे चप्पल व बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा.

नकारात्मक ऊर्जा येते

असे मानले जाते की चप्पल आणि शूज घरासमोर किंवा घरात उलटे ठेवल्याने घरात भांडण होऊ शकतात. वृद्ध मंडळी सांगतात की, चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने किंवा पडल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

शनीचा प्रकोप कायम आहे

असे मानले जाते की घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचा करक मानला जातो.

विचारांवर वाईट परिणाम होतो

घराच्या दारात शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत अशीही एक मान्यता आहे. याचा घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो असे मानले जाते. वास्तूनुसार शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीला मोठ्या प्रमाणात बाधा येते.

(डिस्क्लेमर : ही अभ्यासक्रम सामग्री इंटरनेटवरील सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित लिहिली गेली आहे. टाईम्स नाऊ नवभारत याला दुजोरा देत नाही.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी