Dreams Science: झोपेत 'ही' स्वप्न पडल्यास व्हा सावधान, समजून घ्या स्वप्नांचा अर्थ

भविष्यात काय
Updated Sep 22, 2022 | 19:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dreams Meaning: अशी एखादी क्वचितच व्यक्ती सापडेल , ज्याला स्वप्नच (Dreams) पडत नाहीत. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा (Dreams Meaning) काही ना काही अर्थ असतोच. काही स्वप्ने चांगल्या गोष्टीकडे इशारा करतात तर काही स्वप्नामुळे वाईट घटनाही घडू शकतात.

Dreams Meaning in your sleep be careful
झोपेत पडणाऱ्या स्वप्नाचा काय आहे अर्थ?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अशी स्वप्ने पडल्यास सावधानगिरी बाळगा
  • पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ समजून घ्या
  • स्वप्नांमुळे कधी वाईट तर कधी चांगल्या घटना घडू शकतात.

Types of Dreams: चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची स्वप्ने  (Dreams) आपल्याला पडतात. बऱ्याचदा चांगली स्वप्नं पाहिल्यानंतर आनंद होतो, तर वाईट स्वप्ने पाहिल्यानंतर भीतीही वाटते. असे असे मानले जाते की स्वप्ने नेहमीच काही ना काही संकेत (Dreams Meaning) देत असतात. हा संकेत कधी चांगला तर कधी वाईट दोन्ही असू शकतो. आयुष्यात सतर्क राहण्यासाठी स्वप्नांनी दिलेल्या संकेताचा नीट विचार करा. जाणून घेऊया स्वप्नांचे काय प्रकार असतात. (Dreams Meaning in your sleep be careful)

- जर तुम्हाला स्वप्नात मोठे पोट दिसले तर घाबरण्याची गरज नाही. मोठे पोट दिसणे म्हणजे मोठ्या आशा, मात्र, लहान पोट दिसले तर समजावे की काहीतरी वाईट घडणार आहे. कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते. तेव्हा सावधान राहा. 

अधिक वाचा : अनन्या पांडे एकाच वेळी दोघांना डेट करायची

- एखाद्या महिलेचा गर्भपात झाल्याचं स्वप्न तुम्हाला पडलं तर सावधगिरी बाळगा. भविष्यात तुमच्या योजना अयशस्वी होऊ शकतात हेच ते सूचित करतात. घाईघाईने घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे पश्चातापाची वेळ येऊ शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत काहीतरी अनुचित घडू शकते. तेव्हा सावधगिरी बाळगा. 

- स्वप्नात तुम्ही स्वत:ला काही हिशेब करताना पाहिले ना तर ते शुभ समजावे. आयुष्यातील फायदे आणि तोट्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. पैशाची आणि सत्तेची उधळपट्टी टाळण्यासाठीचा हा इशारा समजावा. 

- एखाद्याचा खून होताना तुम्ही स्वप्नात पाहिलं ना, तर सावधान व्हा. खून पाहणे ही एक गंभीर चेतावणी आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग पुसून टाकण्याचा प्रयत्न करू शकता. हे स्वप्न असेही सांगते की तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकाचाही अंत करायचा आहे.

अधिक वाचा : "..यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"असं का म्हणाली गौरी खान?

- जर तुम्हाला स्वप्नात गाढव दिसले तर सावध व्हा. गाढव हा शब्द मूर्खांसाठी वापरला जातो. कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकेल. इतरांचे ओझे स्वत:च्या पाठीवर वाहण्याची गरज नाही. सावधान राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी