Shani Vakri 2022 । मुंबई : २९ एप्रिल रोजी शनिने कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनिच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुभ परिणाम मिळत आहेत तर काही लोकांसाठी अशुभ परिणाम समोर येत आहेत. दरम्यान ५ जून ते पुढील १४१ दिवस शनि वक्र चालीत म्हणजेच उलट्या चालीत असेल. यानंतर २३ ऑक्टोबरपासून शनि मार्गी होईल. शनिच्या उलट्या चालीमुळे तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी आणि आव्हाने येऊ शकतात. शनि वक्र चालीत असल्यामुळे काही राशींवर संकट ओढावणार आहे. चला तर म जाणून घेऊया त्या राशींबद्दल. (From the first week of jun, Saturn will be vakri position).
अधिक वाचा : या तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात मिळते मोठे पद
कर्क राशीत शनिची धैय्या सुरू आहे. त्यामुळे या राशीसाठी शनि वक्र स्थितीत असणे चांगले नाही. त्यामुळे या कालावधीत कर्क राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे. कारण एखादी छोटीशी गोष्ट मोठा वाद निर्माण करू शकते. या राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावामुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
या राशीमध्ये शनिची धैय्या सुरू आहे. त्यामुळे वक्र चालीत असलेला शनि या राशीसाठी अडचण निर्माण करू शकतो. घरात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरूच राहतील. तुमच्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला पैशाच्या चणचणीचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही कोणत्याही व्यवसायात किंवा इतर कोणाला पैसे देणार असाल तर ते थोडी सावधानता बाळगा. अन्यथा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.
या राशीतही शनीची साडेसाती सुरू आहे. अशा स्थितीत जेव्हा शनि वक्र चालीत असेल तेव्हा या राशीवरही अधिक प्रभाव पडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता फारच कमी आहे. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कायदेशीर कामात अनावश्यक पैसा खर्च होईल. वाहन सावधगिरीने चालवा कारण या राशीचे लोक अपघाताचे बळी ठरू शकतात. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.