पायाच्या अंगठ्यापेक्षा हे बोट असेल मोठं, तर पाहा काय असेल भविष्य

भविष्यात काय
Updated Jul 17, 2019 | 10:35 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

आपल्या पायाची बोटं आणि त्यांची ठेवण अनेकदा आपल्या नशीबाचे काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटंच नाही तर आपल्या शरीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात. जाणून घ्या त्याबद्दलच...

Feet
पायांची ठेवण असं सांगते आपलं भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image

ज्योतिषामध्ये आपणं हस्तरेषांद्वारे आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याबद्दल ऐकलं असेल, मात्र आपल्याला माहितीय का? की आपल्या पायाची बोटं सुद्धा भविष्याबद्दलचे संकेत देत असतात. पायची ठेवण, बोटांचीच नाही तर पायाची त्वचा सुद्धा आपल्या नशीबाचे द्वार उघडू शकतात. भाग्य आपली साथ देतंय की नाही, याबाबतीतील खुलासा आपले पाय सुद्धा करतात.

तसं पाहिलं गेलं तर ज्योतिषशास्त्रानुसार फक्त पायच नाही तर नखं, केस, दात याद्वारे सुद्धा नशीब आणि भविष्याबद्दल माहिती मिळते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल माहिती घ्यायची असेल, तर फक्त कुंडली किंवा हस्तरेषा नाही तर शरीरातील अनेक अवयव त्याच्या नशीबाची माहिती देऊ शकतात. तसंच पायांची भाषा जर वाचता आली तरीही भविष्याबद्दल माहिती मिळते.

जाणून घ्या पायाची ठेवण बघून कसं काय आपलं नशीब आणि भविष्य माहिती पडतं.

  1. मृदू, नरम आणि चमकदार लाल तळवे असलेले पाय सर्वांनाच आवडतात आणि असे पाय सुखमय भविष्याचे संकेत देत असतात. ज्यांचे पाय असे असतात त्यांना आयुष्यात खूप सुख आणि वैभव प्राप्त होतं. अशा व्यक्तींना भाग्याची खूप साथ लाभते आणि ते लोक खूप सुखी आयुष्य जगतात.
  2. आपल्या पायाचा अंगठा जर सामान्यपेक्षा अधिक मोठा आणि जाड असेल तर असा अंगठा आपल्यासाठी चांगले संकेत देत नाही. अशा लोकांचं भाग्य खूप फलदायी नसतं. खूप मेहनत करूनही अशा लोकांना मनासारखं फळ मिळत नाही.
  3. ज्या लोकांचे नखं आरोग्याच्या दृष्टीनं चांगले नसतात. म्हणजे ज्यांच्या नखांवर डाग, तुटलेली नखं आणि क्रॅक असतील. त्यांचं नशीबही साथ देत नाही. अशा लोकांना घरबसल्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच अशा लोकांच्या आयुष्यात नेहमीच आर्थिक संकट असतं.
  4. लांब मांड्या आणि लांब पाय चांगलं भविष्य दर्शवतात. ज्यांचे पाय खूप भरलेली असतात आणि त्यांची लांबी पण चांगली असते. अशा लोकांना आयुष्यात भाग्याची खूप जबरदस्त साथ लाभते. सुख आणि संपत्ती अशा लोकांच्या आयुष्यात भरपूर असते.
  5. ज्या व्यक्तींच्या गुडघ्यावर हाड दिसत नाही, अशा लोकांना नशीबाची साथ मिळत नाही. आयुष्यात खूप मेहनत करूनही अशा लोकांना यश मिळत नाही. त्यांना खूप संघर्ष करावा लागतो.
  6. ज्या लोकांचं पोट गोल आणि फुगलेलं असतं, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांचं पोट नेहमी भरलेलं वाटतं, अशा लोकांच्या आयुष्यात संपत्तीची कमतरता कधीही भासत नाही. अशा लोकांना आयुष्यात खूप आनंद मिळतो.
  7. पायाच्या बोटांमधील तर्जनी जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. असं बोट असणारी व्यक्ती सौभाग्य सूचक मानली जाते.

शरीराच्या विविध अवयवांद्वारे ज्योतिष भविष्याची माहिती देत असतात. मात्र जर आपल्याला वाईट प्रभाव कमी करायचे असतील, तर ज्योतिषी उपाय पण सांगतात. म्हणून जर आपले पाय जर शुभ संकेत देत नसतील तर घाबरून जायचं काम नाही. आपण त्यासंदर्भात योग्य सल्ला घ्यावा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पायाच्या अंगठ्यापेक्षा हे बोट असेल मोठं, तर पाहा काय असेल भविष्य Description: आपल्या पायाची बोटं आणि त्यांची ठेवण अनेकदा आपल्या नशीबाचे काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटंच नाही तर आपल्या शरीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात. जाणून घ्या त्याबद्दलच...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola