Name Astrology: या नावाच्या मुली पतीला बनवतात धनवान; लग्नानंतर अचानक चमकते मुलांचे नशीब

भविष्यात काय
Updated Jun 07, 2022 | 11:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology In Marathi | प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरून होत असते, मग ती व्यक्ती पुरूष असो की स्त्री. ज्योतिष शास्त्रानुसार नावाचा प्रभाव लोकांच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो.

girls of this name make the husband rich, The fate of children suddenly shines after marriage
या नावाच्या मुली पतीला बनवतात धनवान, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरून होत असते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव L अक्षराने सुरू होते त्या मुली भाग्याच्या धनी मानल्या जातात.
  • P या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली स्वभावाने अतिशय साध्या असतात.

Name Astrology In Marathi | मुंबई : प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरून होत असते, मग ती व्यक्ती पुरूष असो वा स्त्री. ज्योतिषशास्त्रानुसार नावाचा प्रभाव लोकांच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या ओळखीव्यतिरिक्त नाव त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये देखील सांगत असते. काही लोक आपल्या नावाचे पहिले अक्षर राशीनुसार ठेवतात. दरम्यान आज आपण अशा मुलींबद्दल भाष्य करणार आहोत ज्या मुली आपल्या पतीला धनवान बनवण्यात अधिक मदत करतात. (girls of this name make the husband rich, The fate of children suddenly shines after marriage). 

अधिक वाचा : कुपवाड्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

A अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली 

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव ए (A) या अक्षराने सुरू होते, त्या मुली त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. असे मानले जाते की लग्नानंतर या मुली पतीच्या प्रगतीसाठी खूप मदत करतात. या नावाने सुरू होणाऱ्या मुलींचे नशीब नेहमीच चमकलेले असते. त्या आयुष्यभर पतीशी एकनिष्ठ राहतात. पतीच्या सुख-दुःखात ढालीसारख्या सोबत असतात.

L अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली 

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव L अक्षराने सुरू होते त्या मुली भाग्याच्या धनी मानल्या जातात. अशा मुली समाजात वेगळी ओळख निर्माण करतात. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायला त्यांना आवडते. यासोबतच या मुली आपल्या कुटुंबासह इतरांनाही मदत करण्यास तयार असतात. एल या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली पूर्ण जबाबदारीने काम करतात. पतीवर खूप प्रेम करतात. अशा मुली पतीच्या प्रत्येक कामात सोबत असतात.

कशा असतात K अक्षराच्या नावाने सुरू होणाऱ्या मुली 

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव K अक्षराने सुरू होते, त्या अतिशय स्पष्ट आणि दृढनिश्चयी असतात. अशा मुली समाजकल्याणासाठी ओळखल्या जातात. या आपल्या शांत स्वभावाने कोणत्याही व्यक्तीचे मन सहज जिंकतात, अशा मुलींशी लग्न करणाऱ्यांचे नशीब लग्नानंतर अधिकच चमकते.

P अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली 

P या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली स्वभावाने अतिशय साध्या असतात. आपल्या बोलण्याच्या खास शैलीने या मुली सगळ्यांनाच त्यांचे चाहते बनवतात. अशा मुली नशिबाने खूप भाग्यवान मानल्या जातात, त्या आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे भाग्य उजळवण्याचे काम करतात. या मुली स्वतः देखील मोठ्या पदावर असतात. राजकारणापासून ते सहकार क्षेत्रात त्यांची मोठी ओळख आहे.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी