Mars Transit Horoscope: आजपासून सुरू होईल या राशींचे चांगले दिवस, मंगल देवाची होईल कृपा

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाचे विशेष स्थान आहे. मंगळ ग्रह सर्व ग्रहांचा प्रमुख मानले जाते. मंगळ ग्रह ऊर्जा, शक्ती, पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. मंगळ ग्रहाला मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामित्व मिळालेले आहे. मंगळ ग्रह मकर राशीत उच्च असतं तर कर्क राशीत खालच्या स्तरावर असतो. १७ मे म्हणजेच आजच्या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे.

mangal gochar horoscope
मंगळ गोचर राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मंगळ ग्रह ऊर्जा, शक्ती, पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते.
 • १७ मे म्हणजेच आजच्या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे.
 • मंगळ राशीच्या परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत.

Mars Transit Horoscope: मुंबई : ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाचे विशेष स्थान आहे. मंगळ ग्रह सर्व ग्रहांचा प्रमुख मानले जाते. मंगळ ग्रह ऊर्जा, शक्ती, पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. मंगळ ग्रहाला मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामित्व मिळालेले आहे. मंगळ ग्रह मकर राशीत उच्च असतं तर कर्क राशीत खालच्या स्तरावर असतो. १७ मे म्हणजेच आजच्या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे. मंगळ राशीच्या परिवर्तनामुळे काही राशींच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया कुठल्या राशीचे येणार दिवस लाभदायक ठरणार आहेत. 


मेष राशी- 

 1. कामात उत्साह राहील, परंतु सांभाळून बोला, जिभेवर नियंत्रण ठेवा.
 2. धार्मिक कार्यात मन लागेल.
 3. आईचे सहकार्य मिळेल.
 4. आईकडून धनप्राप्ती मिळू शकेल. 
 5. जुन्या मित्राची भेट होईल. 
 6. बौद्धिक कार्यातून पैसे मिळतील. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता.
 7. कुटुंबीयांसोबत तीर्थस्थळी जाण्याचा योग होईल. 
 8.  

वृश्चिक राशी- 

 1. व्यवसाय वाढण्याची शक्यता.
 2. भावांचे सहकार्य वाढेल परंतु अधिक मेहनत करावी लागेल.
 3. घरात मंगलमय वातावरण राहील.
 4. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
 5. नोकरीची नवी संधी मिळण्याची शक्यता.
 6. आयात निर्यात व्यवसायात मोठी संधी
 7. नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

कुंभ राशी- 

 1. आत्मविश्वास कमी होईल, पण लढण्याचे बळ मिळेल.
 2. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल.
 3. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होईल, अधिक मेहनत करावी लागेल.
 4. आईचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. 
 5. धनलाभ होईल. 
 6. काही संकट येतील परंतु लढल्याने ही संकट दूर होतील,,

 मीन राशी- 

 1. अभ्यासात मन लागेल..
 2. नोकरीत बढती मिळले, कामानिमित्त प्रवास करण्याचा योग
 3. जोडीदाराचा वेळ आणि प्रेम मिळले. 
 4. प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील.
 5. मित्रांचा सहवास लाभेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी