Lucky Plants : 'चांगले दिवस' येण्यासाठी घरात लावा ही चार झाडं

good luck starts coming as soon as these 4 plants are planted in the house : घरात चार झाडं लावली तर अनेक अडचणी आणि संकटं दूर होण्यास मदत होऊ शकते. चांगले दिवस येऊ शकतात. मनावरचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. सुख समृद्धीचा लाभ होऊ शकतो. भाग्योदय होऊ शकतो. 

good luck starts coming as soon as these 4 plants are planted in the house
Lucky Plants : 'चांगले दिवस' येण्यासाठी घरात लावा ही चार झाडं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Lucky Plants : 'चांगले दिवस' येण्यासाठी घरात लावा ही चार झाडं
  • घरात चार झाडं लावली तर अनेक अडचणी आणि संकटं दूर होण्यास मदत होऊ शकते
  • सुख समृद्धीचा लाभ होऊ शकतो. भाग्योदय होऊ शकतो

good luck starts coming as soon as these 4 plants are planted in the house : 'झाडं लावा झाडं जगवा' हा मूलमंत्र जुनाच आहे. पण 'झाडं लावा आणि वाईट दिवस घालवा' हा पण एक मूलमंत्र जो प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. घरात चार झाडं लावली तर अनेक अडचणी आणि संकटं दूर होण्यास मदत होऊ शकते. चांगले दिवस येऊ शकतात. मनावरचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. सुख समृद्धीचा लाभ होऊ शकतो. भाग्योदय होऊ शकतो. 

वास्तुच्या दृष्टीने झाडं महत्त्वाची आहेत. पण कोणती झाडं घरात कोणत्या ठिकाणी हवी यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे. फेंगशुई नुसार घरात मनीप्लँट, रबर प्लँट, बांबूप्लँट, स्नेकप्लँट ही चार झाडं लावणे आवश्यक आहे. घराच्या खिडकीत, बाल्कनीत (गॅलरी) ही झाडं लावल्यास भाग्योदय होऊ शकतो. 

  1. मनीप्लँट - घराच्या दक्षिण पूर्व दिशेला मनीप्लँट हे झाड लावावे. हे झाड जेवढे जोमाने वाढेल तेवढा भाग्योदय लवकर होईल. कुबेर प्रसन्न होईल. घरात पॉझिटिव्हिटी वाढेल. आर्थिक सुबत्ता येईल.
  2. रबरप्लँट - घरात जिथे पैसे, दागिने, महत्त्वाची कागदपत्रं ठेवता त्या ठिकाणी कपाट, तिजोरी यांच्याजवळ रबराचे झाड लावलेली कुंडी ठेवा. हे झाड जेवढे जोमाने वाढेल तेवढी आर्थिक सुबत्ता लवकर येईल.
  3. बांबूप्लँट - प्रेमविवाह करायचा असेल तर दोन, घरात सुखसमृद्धी नांदावी असे वाटत असेल तर तीन, उत्तम आरोग्यासाठी पाच बांबुची रोपं एकमेकांशी लाल कापडाने बांधावी आणि ही रोपं लावलेली कुंडी घरात जिथे सर्वाधिक सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी ठेवावी. चार बांबूची रोपं कधीही एकत्र बांधू नये तसे करणे फेंगशुईत अशुभ आणि मृत्यूला आमंत्रण समजले जाते. बांबूची रोपं ज्या कुंडीत ठेवली आहेत त्या कुंडीत निवडक रंगीत दगड टाकावे, असेही सांगतात. 
  4. स्नेकप्लँट - फेंगशुईनुसार स्नेकप्लँट घराच्या दाराजवळ लावावे. हे झाड घराचे रक्षण करते. कामाच्या ठिकाणी दाराजवळ हे झाड लावल्यास आर्थिक प्रगती होते. हे झाड मुलांच्या खोलीच्या दाराजवळ लावू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी