grah gochar 2022 : वर्षाच्या शेवटच्या दिवसात, बुध आणि शुक्राचे संक्रमण या राशींचे भाग्य उजळवणार

grah gochar 2022 : बुध आणि शुक्र यांचे धनु राशीतून मकर राशीत संक्रमण होईल. मकर राशीत बुध आणि शुक्र यांचे गोचर होईल.

grah gochar 2022
बुध आणि शुक्राचे संक्रमण या राशींचे भाग्य उजळवणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • grah gochar 2022 : वर्षाच्या शेवटच्या दिवसात, बुध आणि शुक्राचे संक्रमण या राशींचे भाग्य उजळवणार
  • बुध आणि शुक्र यांचे धनु राशीतून मकर राशीत संक्रमण होईल
  • मकर राशीत बुध आणि शुक्र यांचे गोचर होईल

grah gochar 2022 in the last days of the year transit of mercury and venus will bring monetary gains in many zodiac signs, Grah Gochar 2022, Planets Transit 2022, Budh Shukra Gochar 2022, Mercury Venus Transit 2022, Planetary Transit : भारतीय पंचांगानुसार बुधवार 28 डिसेंबर 2022 रोजी बुद्धिची देवता म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह सकाळी 6 वाजता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. तसेच गुरुवार 29 डिसेंबर 2022 रोजी शुक्र संध्याकाळी 4 वाजून 13 मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. बुध आणि शुक्र यांचे धनु राशीतून मकर राशीत संक्रमण होईल. मकर राशीत बुध आणि शुक्र यांचे गोचर होईल. यामुळे कर्क, कन्या, तुळ, मकर आणि मीन राशीच्या नागरिकांच्या आयुष्यात मोठा फरक पडेल, असे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. जाणून घेऊ नेमका कोणत्या राशीच्या नागरिकांच्या आयुष्यावर बुध आणि शुक्र यांच्या मकर राशीतील गोचरचा काय परिणाम होईल...

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. कर्क : मोठा आर्थिक व्यवहार कराल. आर्थिक लाभ होईल. वारसाहक्काशी संबंधित विषयांत आपला लाभ होईल. अविवाहितांसाठी विवाह योग आहे. प्रगती होईल.
  2. कन्या : बुध आणि शुक्र यांच्या मकर राशीतील गोचरमुळे शुभ काळाची सुरुवात होईल. ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात प्रगती करतील. आर्थिक लाभाचा योग आहे. इतरांवर कन्या राशीच्या नागरिकांचा प्रभाव पडेल.
  3. तुळ : शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे तसेच शनिच्या उच्च राशीत तुळ राशीचा समावेश होतो. आता बुध आणि शुक्र यांच्या मकर राशीतील गोचरमुळे तुळ राशीच्या नागरिकांना आर्थिक लाभाचा योग आहे. मोठे यश मिळेल. तब्येत जपणे हिताचे. 
  4. मकर : बुध आणि शुक्र यांच्या मकर राशीतील गोचरमुळे मकर राशीच्या नागरिकांच्या आयुष्यात मोठा परिणाम दिसून येईल. मकर राशीच्या नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची चिन्हं आहेत. लांबच्या प्रवासाचा तसेच परदेश प्रवासाचा योग आहे. तब्येत जपणे, आर्थिक व्यवहार सावधपणे करणे हिताचे.
  5. मीन : ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात प्रगती कराल. आर्थिक लाभ होईल. मोठे आर्थिक निर्णय घेण्याचा योग आहे. उत्पन्नात वाढ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी