Daily Horoscope : गुढी पाडव्याचे राशीभविष्य : शनिवार २ एप्रिल २०२२

Daily rashi bhavishaya, 2nd april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार २ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

Gudi Padwa Daily rashi bhavishaya, 2nd april 2022 daily horoscope in marathi
Daily Horoscope : गुढी पाडव्याचे राशीभविष्य : शनिवार २ एप्रिल २०२२ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : गुढी पाडव्याचे राशीभविष्य : शनिवार २ एप्रिल २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 2nd april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार २ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: क्षमता ओळखून निर्णय घेणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. दिवस आनंदाचा. शुभ रंग - नारिंगी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: सदैव सावध राहणे आणि संयम राखणे हिताचे. दिवस उत्सवाचा असला तरी साहसाचा नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वागा. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: अतिरेक टाळणे, वास्तवाचे भान राखणे हिताचे. तब्येत जपणे फायद्याचे. दिवस सणासुदीचा असला तरी क्षमतेपेक्षा जास्त दगदग टाळणे हिताचे. शुभ रंग - हिरवा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे लक्षात ठेवा. कोणाला झेपणार नाही असे आश्वासन देऊ नका तसेच कोणावरही विसंबून राहू नका. आत्मनिर्भरता महत्त्वाची आणि हिताची असते हे लक्षात ठेवा. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: वागणे बोलणे संयमाने आणि विचारपूर्वक करणे हिताचे. वाद टाळणे आणि कायदे नियम पाळणे फायद्याचे. शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. गोड बोलून कामं करून घेणे फायद्याचे. कायदे पाळणे सोयीचे. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: चौकशी करून आणि खात्री करून नंतर निर्णय घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला हिताचा. दिवस चांगला आहे. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: वास्तवाचे भान राखणे आणि जेवढ्यास तेवढे बोलणे हिताचे. व्यवहार महत्त्वाचा हे लक्षात ठेवा. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - आकाशी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आत्मनिर्भर व्हा. नवी कौशल्य शिका. आज आनंद साजरा कराल. दिवस मजेत घालवाल. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कायदे आणि नियम पाळणे तसेच चुकीच्या कृत्यांपासून दूर राहणे हिताचे. प्रलोभने देऊ नका आणि प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका. वास्तवाचे भान राखणे परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल कराल. प्रगती होईल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: तुम्ही सकारात्मक विचार कराल तर प्रतिसाद पण सकारात्मक मिळेल. नवी ऊर्जा मिळेल. प्रगती कराल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी