Gudi Padwa, Gudhi Padwa, Horoscope : कोणत्या राशीसाठी कसा असेल गुढी पाडव्याचा दिवस?

Gudi Padwa Horoscope Wednesday 22 March 2023, Today Horoscope in Marathi, Gudhi Padwa Horoscope : यंदा गुढी पाडवा बुधवार 22 मार्च 2023 रोजी आहे. कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Horoscope
कसा असेल आजचा दिवस?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोणत्या राशीसाठी कसा असेल गुढी पाडव्याचा दिवस?
  • जाणून घ्या आपले बुधवार 22 मार्च 2023 चे राशीभविष्य
  • कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

Gudi Padwa Horoscope Wednesday 22 March 2023, Today Horoscope in Marathi, Gudhi Padwa Horoscope : यंदा गुढी पाडवा बुधवार 22 मार्च 2023 रोजी आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढी पाडवा हा सण शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. हा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल? कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

मराठी नववर्ष गुढी पाडवा साजरा करण्यासाठी घराच्या दारासमोर काढा ही आकर्षक रांगोळी, बघा व्हिडीओ

गुढी कशी उभारावी? वाचा संपूर्ण पद्धत आणि मुहूर्त, काय आहे गुढीपाडवा सणाचं महत्त्व?

गुढीपाडव्यासाठी अस्सल मराठी पाककृती

  1. मेष : करिअरमध्ये अडचणींना हुशारीने सामोरे जाणे हिताचे. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस आहे. तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर असताना सावध राहा. शुभ रंग : लाल
  2. वृषभ : धावपळ होईल. तब्येत जपा. काळजीचे मुद्दे असले तरी हुशारीने परिस्थिती हाताळणे आणि दिवस साजरा करणे महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. शुभ रंग : हिरवा
  3. मिथुन : स्वप्नांची पूर्तता होईल. नाती जपणे आणि वाद टाळणे हिताचे. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस आहे. तब्येत जपा. शुभ रंग : केशरी
  4. कर्क : हुशारीने परिस्थिती हाताळणे हिताचे. दिवस चांगला आहे. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि सावधपणे महत्त्वाचे निर्णय घेणे तसेच मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे. शुभ रंग : पांढरा
  5. सिंह : प्रगतीचा आणि आनंदाचा दिवस आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. चुका करणे, चुकीचे कृत्य करणे टाळा. वाहन जपून चालवा. शुभ रंग : निळा
  6. कन्या : चांगला दिवस आहे. तब्येत जपा. ध्यान आणि योगा करणे फायद्याचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक मोठे निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग : गुलाबी
  7. तूळ : तब्येत जपा. दिवस चांगला आहे. बाहेरचे खाणे टाळा. व्यावसायिक परिस्थितीचा कौटुंबिक पातळीवर परिणाम होऊ नये यासाठी हुशारीने परिस्थिती हाताळावी लागेल. शुभ रंग : जांभळा
  8. वृश्चिक : आर्थिक प्रश्न सुटेल. घरच्यांना वेळ द्याल. तब्येत जपा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक मोठे निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग : लाल
  9. धनु : कौटुंबिक पातळीवर परिस्थिती हुशारीने हाताळणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक मोठे निर्णय घेणे हिताचे. दिवस चांगला आहे. शुभ रंग : जांभळा
  10. मकर : दिवस चांगला आहे. पण परिस्थिती हुशारीने हाताळणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक मोठे निर्णय घेणे हिताचे. सावधपणे महत्त्वाचे निर्णय घेणे लाभाचे. शुभ रंग : लाल
  11. कुंभ : दिवस आनंददायी आणि चांगला असल्याचा अनुभव येईल. काही वेळा गप्प राहणे हिताचे. परिस्थितीचा अंदाज घेऊन वर्तन करा. सावधपणे महत्त्वाचे निर्णय घेणे लाभाचे. शुभ रंग : पांढरा
  12. मीन : प्रगती होईल. दिवस चांगला आहे. आनंदवार्ता कळेल. तब्येत जपणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग : पिवळा
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी