Guru Chandal Yog, Jupiter Transit 2023 गुरूचे 22 एप्रिल रोजी मेष राशीत संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत मेष राशीमध्ये गुरु आणि राहुची युती होणार आहे. गुरु हा शुभ ग्रह असून राहु हा अशुभ ग्रह मानला जातो. गुरूचा शुभ प्रभाव राहू नष्ट करण्याचे काम यादरम्यान करेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत मेष राशीमध्ये गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. जो आपल्या अशुभ प्रभावांमध्ये मेष राशीसह अनेक राशींना हानी पोहोचवण्याचे काम करेल. चला जाणून घेऊयात मेष राशीमध्ये तयार झालेल्या गुरु चांडाळ योगामुळे कोणकोणत्या राशींना नुकसान होणार आहे. (Guru Chandal Yog Negative Impact will reate many problems for these 5 zodiac sign)
मेष रास असलेल्या लोकांच्या लग्न घरात गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. पुढील 7 महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यात मोठे संकट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महत्वाच्या कार्यात हाती निराशा येण्याची देखील शक्यता आहे. तसेच मेष राशीच्या लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. व्यवसायात तुमचे नुकसान होऊ शकते किंवा अनपेक्षित असे काही खर्च होऊ शकतात जे टाळता येत नाहीत. तुमच्या तब्येतीवर देखील परिणाम पडू शकतो.
अधिक वाचा : 31 मार्चपर्यंत 'हे' काम न केल्यास बंद होणार तुमचे खाते
राशी चक्राची तिसरी रास ही मिथुन आहे. मिथुन रास असलेल्या लोकांवर गुरु चांडाळ योग भरपूर मोठ्या प्रमाणात अशुभ प्रभाव पाडू शकतो. याच्या प्रभावामुळे तुम्हाला अशुभ वार्ता मिळतील. पैसा आणि आरोग्याच्या बाबतीतही नुकसान होऊ शकते. व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायला गेल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घाईगडबडीत असा कोणताही निर्णय घेऊ नका ज्यामुळे नंतर तुम्हाला त्रास होईल. कोणताही निर्णय संयमाने आणि सावधगिरीने घ्या. ऑफिसमध्ये वारिष्ठांसोबत किंवा बॉससोबत तुमचे वाद होऊ शकतात.
तुमच्या राशीत आठव्या घरात गुरु चांडाळ योग बनत आहे. त्याच्या प्रभावामुळे तुमच्या महत्वाच्या कामात अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही घर बांधत असाल, किंवा मालमत्तेविषयक कोणतेही व्यवहार करत असाल तर विशेष काळजी घ्या. यादरम्यान तुमचे वेतन कमी राहील आणि खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण राहील. घरातील वातावरण देखील चांगले राहणार नाही, आणि आपापसात मतभेद होतील. कुटुंबातील एक व्यक्ति गंभीर आजारी पडण्याची शक्यता यादरम्यान आहे. व्यावसायिक आणि कौटुंबिक आशांततेमुळे तुम्ही या काळात मानसिक तणावाखाली असाल.
अधिक वाचा : वय 30 झालं तरी 40 व्या वर्षी व्हाल करोडपती? कसं जाणून घ्या
धनू रास असलेल्या लोकांना गुरु चांडाळ योगमुळे अनेक अडचणी येणार आहेत. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. अपघात होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुकसान होऊन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. ज्यामुळे तुमचे आर्थिक वेळापत्रक देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी अनाहूत भीती त्रास देईल, काहीतरी अशुभ घडणार आहे असे सारखे वाटत राहील. नोकरी आणि व्यवसायातही कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत तुमच्या कामावर अधिकारी असमाधानी राहतील, तर व्यवसायातदेखील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी त्यांच्या राशीतून चौथ्या घरात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. त्यामुळे येणार काळ मकर राशीच्या लोकांसाठी अनेक संघर्ष घेऊन येणार आहे. घरगुती कलह आणि जास्त खर्चामुळे तुमच्या आयुष्यात अशांतता निर्माण होऊ शकते. सासरच्या लोकांसोबत तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तसेच मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला अनेक प्रकारच्या गोंधळांना सामोरे जावे लागू शकते. काही जुन्या मुद्द्यांवरून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतील. त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक नात्यावर देखील होईल.