Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : गुरु गोचर, चार राशींना होणार फायदा

Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह (बृहस्पती) २९ जुलै २०२२ पासून मीन राशीत वक्री होणार आहे. वक्री होत असलेल्या गुरुमुळे वृषभ, मिथुन, कर्क आणि कुंभ या चार राशींच्या नागरिकांना फायदा होणार आहे.

Guru Gochar 2022 Guru Transit 2022 Jupiter Transit 2022 Effect On 4 Zodiac Signs
Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : गुरु गोचर, चार राशींना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : गुरु गोचर, चार राशींना होणार फायदा
  • वक्री होत असलेल्या गुरुमुळे वृषभ, मिथुन, कर्क आणि कुंभ या चार राशींच्या नागरिकांना फायदा
  • गुरु ग्रह मीन राशीत २४ नोव्हेंबर २०२२ पासून पुन्हा सामान्य पद्धतीने मार्गस्थ होणार

Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह (बृहस्पती) २९ जुलै २०२२ पासून मीन राशीत वक्री होणार आहे. वक्री पद्धतीने मार्गस्थ होत असलेला गुरु ग्रह मीन राशीत २४ नोव्हेंबर २०२२ पासून पुन्हा सामान्य पद्धतीने मार्गस्थ होणार आहे. याआधी गुरु ग्रहाने १२ एप्रिल २०२२ रोजी मीन राशीत प्रवेश केला. मीन राशीत गुरु ग्रह एप्रिल २०२३ पर्यंत राहणार आहे. पण वक्री होत असलेल्या गुरुमुळे वृषभ, मिथुन, कर्क आणि कुंभ या चार राशींच्या नागरिकांना फायदा होणार आहे.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

वृषभ रास : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह मीन राशीत वक्री झाल्यामुळे वृषभ राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. गुरु वृषभ राशीत अकराव्या भावात वक्री होणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या नागरिकांना नोकरीत नवी संधी मिळेल किंवा जिथे कार्यरत आहेत तिथे मोठा आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. संबंधित व्यक्तीचा प्रभाव वाढेल.

मिथुन रास : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह मीन राशीत वक्री झाल्यामुळे मिथुन राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. गुरु मिथुन राशीत दहाव्या भावात वक्री होणार आहे. यामुळे मिथुन राशीच्या नागरिकांचा प्रभाव वाढेल. आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम काळ. नोकरीच्या ठिकाणी फायद्यात राहतील.

कर्क रास : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह मीन राशीत वक्री झाल्यामुळे कर्क राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. गुरु कर्क राशीत नवव्या भावात वक्री होणार आहे. यामुळे कर्क राशीच्या नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. संबंधित नागरिक अधिकाधिक अध्यात्मिक होतील.

कुंभ रास : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह मीन राशीत वक्री झाल्यामुळे दुसऱ्या भावात वक्री होणार आहे. यामुळे कुंभ राशीच्या नागरिकांचे कामाच्या ठिकाणी असलेले महत्त्व वाढेल. त्यांचे भरपूर कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल.

गोचर काळ

प्रत्येक ग्रह/तारा/नक्षत्र प्रत्येक राशीत विशिष्ट कालावधीसाठी असतो. यालाच संबंधित ग्रहाचे/ताऱ्याचे/नक्षत्राचे त्या त्या राशीतले गोचर म्हणून ओळखले जाते. सूर्य, शुक्र, बुध प्रत्येक राशीत एक महिना तर चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस गोचर करतो. मंगळ प्रत्येक राशीत ५७ दिवस तर गुरु प्रत्येक राशीत एक वर्ष गोचर करतो. राहू आणि केतू प्रत्येक राशीत दीड वर्ष तर शनि (शनी) प्रत्येक राशीत अडीच वर्ष गोचर करतो.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी