Guru Margi: 24 नोव्हेंबरला मीन राशीत प्रवेश करणार गुरू, या राशीच्या लोकांवर लक्ष्मी होणार प्रसन्न

Guru Margi November 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी गुरू मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे. जाणून घेऊया कुठल्या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे.

guru gochar 2022
गुरू गोचर २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रानुसार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी गुरू मीन राशीत प्रवेश करणार आहे.
  • त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे.
  • जाणून घेऊया कुठल्या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे.

Guru Margi November 2022: ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाचे विशेष स्थान आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरू ग्रह शुभ फळ देणारे ग्रह मानला जातो. ज्योतिष शास्त्रनुसार गुरू ग्रह सन्मान, लग्न, भाग्य, अध्यात्म, संततीचे प्रतीक मानले गेले आहे. गुरू ग्रह पुत्र, पत्ग्नी, धन, शिक्षा आणि वैभवाचेही प्रतीक मानले जाते. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह कुठल्यातरी राशीत प्रवेश करत असतो. त्यामुळे काही ग्रहांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी गुरू मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे. जाणून घेऊया कुठल्या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे. (guru gochar in meen rashi 2022 these zodiac sign will benefit)

अधिक वाचा :  Lunar Eclipse 2022: ग्रहण काळात खाणे-पिणे म्हणजे विषाचं सेवन करणं, जाणून घ्या काय आहेत नियम

वृषभ राशी 

गुरू ग्रह मीन राशी प्रवेश करणार आहे, त्यामुळे वृशभ राशीच्या लोकांचे आगामी दिवस सुखाचे असतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. सहकर्मचार्‍यांमध्ये तुमचा आदर वाढेल. व्यवसायाच्या ठिकाणी मोठा नफा होईल. करीअरमध्ये नवीन संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. 

अधिक वाचा : Chanakya Niti: पुरुषांच्या या तीन सवय पाहून महिला होत असतात घायाळ, लगेच करू लागतात जवळीक

कर्क राशी

देवगुरू मीन राशी प्रवेश केल्याने कर्क राशीच्य लोकांचे दिवस पालटणार आहेत. कर्क राशीच्या लोकांना व्यापारात फायदा होईल. नवीन उद्योग करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. गुंतवणुकीसाठी येणारा काळ शुभ आहे. कर्क राशी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार आहेत. जोडीदाराचे प्रेम लाभेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.  

अधिक वाचा : Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही 'हे' काम केलात तर होईल नुकसान, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी 

कन्या राशी

गुरू मार्गी होत असल्याने कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागणार आहे. तसेच जुन्या आजारातून मुक्तता मिळणार आहे.

वृश्चिक राशी

गुरू ग्रह मीन राशीत गोचर करणार असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तसेच या काळात धनलाभही होईल. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी