Chandra Grahan 2019: 'या' राशींवर होणार चंद्र ग्रहणाचा परिणाम, करा 'हे' उपाय 

भविष्यात काय
Updated Jul 16, 2019 | 09:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chandra Grahan 2019: १६ जुलै रोजी खंडग्रास चंद्रगहण आहे. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावे याबाबतची माहिती ज्योतिषाचार्य सुजीत महाराज यांनी दिली आहे. 

LUNAR
पाहा चंद्र ग्रहणादरम्यान कोणत्या राशींवर काय उपाय (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • चंद्र ग्रहणाचे वेध हे १६ जुलैला संध्याकाळी ४.३० वाजता लागणार आहेत.
 • हे ग्रहण धनू राशीच्या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असणार आहे. 
 • पाहा चंद्र ग्रहणादरम्यान कोणत्या राशींवर काय उपाय

मुंबई: Chandra Grahan: गुरुपौर्णिमा आणि चंद्र ग्रहण हे एकाच दिवशी आल्याने त्याचे नेमके काय परिणाम आपल्या राशीवर होणार हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आज (१६ जुलै) खंडग्रास चंद्र ग्रहण आहे. तसंच व्यासपौर्णिमा देखील आहे. त्यामुळे या दोन्हीबाबत ज्योतिषाचार्य सुजीत महाराज यांनी राशीभविष्यासंबंधी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. १६ जुलैला चंद्र ग्रहण हे रात्री १ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होणार असून १७ जुलैला पहाटे ४ वाजून ३१ मिनिटांनी संपणार आहे. चंद्र ग्रहणाचे वेध हे १६ जुलै रोजी सांयकाळी ४.३० वाजता लागणार आहेत. हे ग्रहण धनु राशीच्या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असणार आहे. 

वेधादी काळापासून ते ग्रहण काळापर्यंत सर्व मंदिरांचे दरवाजे हे बंद असतात. त्यामुळे या दरम्यान कुणीही देवाच्या मूर्तीला किंवा फोटोंना स्पर्श करत नाहीत. चंद्र ग्रहणादरम्यान अनेक गर्भवती महिला या घराबाहेर पडत नाहीत. चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण यामध्ये बराच फरक आहे. कारण चंद्र ग्रहण हे उघड्या डोळ्याने आपण पाहू शकतो. पण सूर्य ग्रहण उघड्या डोळ्याने पाहता येत नाही. कारण चंद्राच्या तुलनेत सूर्याची किरणं ही अतिशय तीव्र असतात. जे डोळ्यांना हानिकारक ठरू शकतं. सूर्य ग्रहणादरम्यान सोलर रेडिएशनमुळे डोळ्यांचा नाजूक भागांना दुखापत होऊ शकते. ज्यामुळे रेटिनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तर चंद्र ग्रहणादरम्यान सोलर रेडिएशनचा कोणताही धोका नसतो. त्यामुळे त्याचा डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळेच चंद्र ग्रहण हे आपण उघड्या डोळ्यांनी देखील पाहू शकतो. पण या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करु नये असं म्हटलं जातं. 

चंद्र ग्रहणादरम्यान राशींनुसार उपाय: 

 1. मेष- सुंदरकांडचं पठण करा. हनुमानाची उपासना करा. मसूर डाळ दान करा. 
 2. वृषभ- श्री सूक्तचे पठण करा, दुर्गासप्तशतीचंही पठण करा. तांदूळ दान करा 
 3. मिथुन- श्री विष्णुसहस्रनामाचं पठण करा. मूग दान करा. यासोबतच श्री गणेशाचीही उपासना करा
 4. कर्क- भगवान शंकराची उपासना करा. तसेच श्री रामचरितमानसमधील अरण्यकांड याचेही पठण करा. 
 5. सिंह- हनुमानाची उपासना करा. यासोबतच गहू आणि गूळ याचं दान करा.
 6. कन्या- विष्णूची उपासना करा तसंच श्री रामचरितमानसचं देखील पठण करा. 
 7. तूळ- श्री सूक्तचे पठण करा. सिद्धिकुंजिकस्तोत्राचेही पठण करा. सोबतच तांदूळ देखील दान करा.  
 8. वृश्चिक- हनुमान चालीसाचं १०८ वेळा पठण करा. गहू दान करा.
 9. धनू- आज ग्रहण या राशीवर आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी ईश्वर ध्यान्यात व्यतित करावा. तसेच अन्नदान देखील करावे. 
 10. मकर- सुंदरकांडचे पठण करावे. हनुमानाची उपासना करावी. गूळ दान करावे. 
 11. कुंभ- हनुमान बाहुक याचे पठण करावे. अन्न किंवा गूळ दान करावे. 
 12. मीन- श्री विष्णूसहस्रनाम याचे पठण करावे. अन्न किंवा गोड वस्तू दान कराव्यात. 

चंद्र ग्रहणानंतर स्नान करुन घरातील देव हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. त्याने पुन्हा शास्त्रोक्त पूजा करावी. तसेच काही वस्तू या दानही कराव्यात. कारण की, दानाला एक विशेष महत्त्व आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Chandra Grahan 2019: 'या' राशींवर होणार चंद्र ग्रहणाचा परिणाम, करा 'हे' उपाय  Description: Chandra Grahan 2019: १६ जुलै रोजी खंडग्रास चंद्रगहण आहे. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावे याबाबतची माहिती ज्योतिषाचार्य सुजीत महाराज यांनी दिली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...