Guru Vakri Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह २९ जुलै २०२२ पासून मीन राशीत वक्री चाल सुरू करणार आहे. गुरु ग्रहाच्या या स्थितीचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊ.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय
Guru Gochar 2022, Guru Transit 2022 : गुरु गोचर, चार राशींना होणार फायदा
सूर्य गोचर २०२२, ३ राशींना फायदा, सूर्याचा शुभ प्रभाव
गुरु (Jupiter किंवा बृहस्पती) हा सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह. गुरु ग्रहाची रास धनु आणि मीन. गुरुवार हा या ग्रहाचा दिवस. तसेच ब्रह्मदेव आणि बृहस्पति यांचाही दिवस गुरुवार हाच आहे. सूर्य, मंगळ आणि चंद्र हे गुरु ग्रहाचे मित्र ग्रह तर शुक्र आणि बुध हे शत्रू ग्रह. शनि आणि राहु हे गुरुचे समग्रह आहेत. कर्क राशीत उच्चीचा आणि मीन खालच्या पातळीवर गुरु ग्रहाचे स्थान आहे. मंगळाची साथ लाभ गुरु प्रबळ होतो आणि सूर्याची साथ लाभते तेव्हा ज्यांच्या कुंडलीत गुरुचे स्थान प्रमुख आहे अशांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. गुरु ग्रहाचे अध्यात्मात प्रमुख स्थान आहे.
प्रत्येक ग्रह/तारा/नक्षत्र प्रत्येक राशीत विशिष्ट कालावधीसाठी असतो. यालाच संबंधित ग्रहाचे/ताऱ्याचे/नक्षत्राचे त्या त्या राशीतले गोचर म्हणून ओळखले जाते. सूर्य, शुक्र, बुध प्रत्येक राशीत एक महिना तर चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस गोचर करतो. मंगळ प्रत्येक राशीत ५७ दिवस तर गुरु प्रत्येक राशीत एक वर्ष गोचर करतो. राहू आणि केतू प्रत्येक राशीत दीड वर्ष तर शनि (शनी) प्रत्येक राशीत अडीच वर्ष गोचर करतो.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.