Palmistry: तुमच्या हातावर ‘ही’ रेषा असेल, तर लवकरच व्हाल श्रीमंत

भविष्यात काय
Updated Jun 04, 2019 | 22:05 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Hastrekha shastra: हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. त्यातच अनेक जण हस्तरेषांवरून आपलं भविष्य बघत असतात. हस्तरेषा आपल्या कर्मानुसार बदलत असतात आणि भविष्याचे संकेत देतात.

Palm Reading
हातावरील सुमन रेषा काय देते संकेत पाहा 

Palmistry: हिंदू शास्त्रानुसार अनेक लोक हस्तरेषांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या भविष्याबद्दल संकेत देत असतात. असं म्हणतात की, आपल्या कर्मानुसार हातावरील रेषा बदलत असतात. मात्र, हस्तरेषा शास्त्रानुसार हातावरील मुख्य रेषांच्या ऐवजी अनेक छोट्या-छोट्या रेषा हातावर असतात त्यांना गौण रेषा म्हटलं जातं. अशा असंख्य छोट्या रेषांमध्ये फक्त एक रेष मुख्य असते आणि त्या रेषेला सुमन रेषा म्हणतात.

हस्तरेषा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ही सुमन रेषा असते. शिवाय प्रत्येकाच्या हातावरील या रेषेचं स्वरूप वेगळं असतं. सुमन रेषेवरून व्यक्तीच्या भविष्याबद्दल माहिती मिळते. जाणून घ्या सुमन रेषा कुठं असते आणि तिचा काय प्रभाव पडतो.

हातावर 'या' ठिकाणी असते सुमन रेषा

असं म्हटलं जातं की, सुमन रेषा केतू पर्वतापासून निघते. केतू पर्वत हाताच्या शुक्र आणि चंद्र पर्वताला वेगळं करत भाग्य रेषेजवळ असतो. मात्र, सुमन रेषेचा अखेरचा भाग हा प्रत्येक व्यक्तीच्या हातावर वेगवेगळा असू शकतो. याच आधारावर त्या व्यक्तीसीठी ही सुमन रेषा शुभ आणि की अशुभ हे समजतं. हातावरील सुमन रेषा ही केतू पर्वतावरून निघून बुध पर्वताकडे जाते. यादरम्यान जर सुमन रेषा आरोग्य रेषेला स्पर्श करत असेल तर त्या व्यक्तीला गंभीर आजार होऊ शकतो.

सुमन रेषेचा काय-काय प्रभाव पडू शकतो पाहा

  1. ज्या व्यक्तीच्या हातावर सुमन रेषा आरोग्य रेषेच्या समांतर जात असेल, तर याचा अर्थ त्या व्यक्तीचं आरोग्य अगदी उत्तम राहिल.
  2. जर सुमन रेषा दुसऱ्या कोणत्याही रेषेला स्पर्श न करता बुध पर्वतापर्यंत जात असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तिला खूप मान-सन्मान मिळेल.
  3. जर सुमन रेषा सूर्य पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा अर्थ हा आहे की, त्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळेल.
  4. आपल्या हातावरील सुमन रेषा समांतर होत शनी पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर ती व्यक्ती अनेक प्रयत्न आणि मेहनत करून कोणतंही ध्येय साध्य करू शकतो.
  5. जर सुमन रेषा जीवन रेषेपर्यंत जात असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
  6. जर सुमन रेषा शुक्र पर्वताकडे वळली असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात खूप प्रेम मिळतं.
  7. सुमन रेषेच्या अखेरच्या भागात त्रिशूळाचं चिन्ह तयार होत असेल तर ती व्यक्ती खूप ज्ञानी असते.

याप्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या हातावरील सुमन रेषा वेगळी असते. साधारणपणे ज्योतिषी हातावरील सुमन रेषा बधून व्यक्तीचं भाग्यफळ सांगतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Palmistry: तुमच्या हातावर ‘ही’ रेषा असेल, तर लवकरच व्हाल श्रीमंत Description: Hastrekha shastra: हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. त्यातच अनेक जण हस्तरेषांवरून आपलं भविष्य बघत असतात. हस्तरेषा आपल्या कर्मानुसार बदलत असतात आणि भविष्याचे संकेत देतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...