Horoscope 27 October 2022: या राशींचे फळफळणार नशीब, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 26 October 2022 : आज गुरूवार २६ ऑक्टोबर २०२२. आज काही राशीच्या लोकांचे नशीब चांगले आहे, त्यांचे नशीब फळफळणार आहे. तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

daily horoscope 27th october 2022
दैनिक राशीभविष्य 27th October 2022  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज गुरूवार 27 ऑक्टोबर 2022.
 • आज काही राशीच्या लोकांचे नशीब चांगले आहे, त्यांचे नशीब फळफळणार आहे.
 • तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Horoscope 27 October 2022 : आज गुरूवार 27 ऑक्टोबर 2022. आज काही राशीच्या लोकांचे नशीब चांगले आहे, त्यांचे नशीब फळफळणार आहे. तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. (Horoscope 26 ocotber 2022 thursday  These zodiac signs will fortunate today Know todays horoscope)

 1. मेष : व्यवसायात लाभ होईल. आज विष्णू सहस्रनामाच पठण करावे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल आणि उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. आजचा शुभ रंग : लाल आणि पिवळा
 2. वृषभ - आज तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. नवीन काम सूर करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुळशीचे झाड लावावे. आजचा शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 3. मिथुन : कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आयुष्यात यश मिळे. कुटुंबीयांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. उडीद दान करावे. आजचा शुभ रंग : लाल आणि आकाशी
 4. कर्क : आज अपत्याला शिक्षणात यश लाभेल, तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी यश लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवश शुभ आहे, परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. अनेक दिवस रखडलेले काम पूर्ण होईल. मसूर दान करावी. आजचा शुभ रंग : लाल आणि पिवळा
 5. सिंह :  नोकरीची नवी संधी चालून येईल, राजकारणात आणि समाजकारणात यश मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. आजचा शुभ रंग : सफेद आणि नारंगी. 
 6. कन्या : व्यवसायात यश लाभेल, विचार करून गुंतवणूक करावी. धार्मिक कार्यात मन लागेल. गरजूंना मदत केल्यास संकट दूर होतील. शुभ रंग : हिरवा आणि सफेद
 7. तूळ : नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल. विचार करून खर्च करावा.   आजचा शुभ रंग :  पिवळा आणि नारंगी.
 8. वृश्चिक : कर्क आणि मकर राशीच्या लोकांची मदत होईल. तरुणांसाठी नोकरीची संधी चालून येईल. अविवाहित तरुण आणि तरुणींसाठी इच्छूक जोडीदार मिळेल. आजचा शुभ रंग :  पिवळा आणि लाल रंग
 9. धनु :आज दिवस अतिशय अनुकूल आणि शुभ आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आज चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. व्यवसायात मोठा नफा होणार आहे. आजचा शुभ रंग :  नारंगी आणि पिवळा रंग.
 10. मकर: कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदरी मिळण्याची शक्यता आहे. मेष आणि मीन राशीच्या मित्रांकडून लाभ होईल. तीर्थयात्रेचा योग येईल. आजचा शुभ रंग :  जांभळा आणि आकाशी.
 11. कुंभ :आयटी आणि बँकिंग क्षेत्रात काम करणार्‍या लोकांची आज प्रगती होईल. गाईला केळी खाऊ घालावी. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग :  हिरवा आणि नारंगी
 12. मीन : व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता. शत्रू सक्रिय होती सावध रहा. सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, राग राग करू नका. जोडीदाराकडून प्रेम मिळेल.  आजचा शुभ रंग : लाल आणि पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी