Horoscope Today, 04 March 2023: शनिदेवाची आज 'या' राशींवर वक्रदृष्टी, सावध रहा, मोठे नुकसान होण्याची शक्यता

Horoscope Today, 04 March 2023: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. आज काही राशी आहेत ज्यावर आज शनिदेवाची वाईट नजर असू शकते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Horoscope Today, 04 March 2023 Shani Maharaj's grace on these three zodiac signs today, read the zodiac horoscope
Horoscope Today, 04 March 2023: शनिदेवाची आज 'या' राशींवर वक्रदृष्टी, सावध रहा, मोठे नुकसान होण्याची शक्यता   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज अशा काही राशींवर शनीची वाईट नजर असू शकते.
  • या राशीच्या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
  • जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस कसा राहील.

Horoscope Today, 04 March 2023 : शनिवारचा दिवसा हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाच्या उपासनेचा विशेष दिवस. असे म्हणतात की ज्या लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो त्यांची खूप प्रगती होते. दुसरीकडे, ज्यांच्यावर शनिचा कोप होतो, त्यांना सर्व संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शनीची कृपा आपल्यावर पडावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. परंतु आजचे राशीभविष्य काही राशींसाठी शुभ संकेत देत नाही. (Horoscope Today, 04 March 2023 Shani Maharaj's grace on these three zodiac signs today, read the zodiac horoscope)

अधिक वाचा : Holi 2023 date & Time : भाई कब है होली ? जाणून घ्या होळीची अध्यात्मिक कथा, पंचांग; होलिका दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व

मेष
आज तुमच्या दिवसाची सुरुवात उर्जा आणि उत्साहाने होईल पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला थकवा जाणवेल. व्यवसायात आज फायदा होईल. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आज सावध राहण्याची गरज आहे. आज आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

वृषभ
आज व्यवसायात उत्तम काम होईल. तुम्ही तुमचे जीवन इतर अनेक पैलूंमधून पहाल. आज तुमची कमाई वाढेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. तुमच्या जीवनसाथीला पुरेसा वेळ द्या. आज आरोग्य चांगले राहणार आहे.

मिथुन
आज तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज खर्च वाढताना दिसत आहे.आज तुमच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकते. तुमच्या प्रयत्नांनी सर्व काही यशस्वी होईल.तुमचे जीवन पूर्वीसारखे चालू लागेल. छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका.

अधिक वाचा : National Safety Day 2023 : राष्ट्रीय सुरक्षा दिवस का साजरा केला जातो?, भाषणासाठी जाणून घ्या इतिहास आणि थीम...

कर्क
शुक्र तुमच्या अनुकूल नाही, जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आज शत्रूंपासून दूर राहावे. आज पगार वाढण्याची शक्यता आहे, कुटुंबासोबत वेळ घालवाल. पूर्वीपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील.

सिंह 
आज तुम्ही अशा लोकांसोबत काम कराल जे भविष्यात तुमच्यासाठी फलदायी ठरतील. तुमच्या मैत्रीपूर्ण वागण्याने तुम्ही लोकांची मने जिंकाल. चांगली गोष्ट म्हणजे आज एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट यशस्वी होईल. दुपारनंतर थोडे अस्वस्थ वाटू शकते. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

कन्या
आज तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात यश मिळेल, कुटुंबासोबत गुंतवणुकीशी संबंधित विषयांवर आज चर्चा होऊ शकते. तुमचे सहकारी आज तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. दिवसाच्या शेवटी थकवा जाणवेल. तुम्हाला पाठदुखीची समस्या असू शकते.

तूळ
आज तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही कारण तुमचे मन खूप व्यस्त असेल. शुक्र परिवर्तनामुळे तुमची काही कामे पुढे ढकलतील. तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.

वृश्चिक
आज नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्याची संधी मिळेल. पूर्वीची कामे आज पूर्ण कराल. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल चिंतित असाल. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. करिअरच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा होईल.

अधिक वाचा : कर्जत-सीएसटी अंतर होणार कमी ; नवीन रेल्वे कॉरिडॉरने प्रवाशांचे 25 मिनिट वाचणार

धनु
आज व्यवसायात जास्त कामामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. नोकरदार लोकांना आज चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. व्यवसाय असो किंवा प्रेमसंबंध असो धीराने काम करा. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांगली दिनचर्या पाळा.

मकर
आज तुम्ही जो निर्णय घ्याल तो यशस्वी होईल. व्यावसायिक व्यवहार अधिक प्रभावीपणे आयोजित करू शकाल. आज लग्नासाठी बोलणी करण्यासाठी योग्य वेळ आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आजचा प्रवास यशस्वी होणार नाही याचा विचार करा. तुम्ही आजारी पडू शकता.

अधिक वाचा : ​ RRR नंतर ऑस्कर 2023 मध्ये आता दीपिका पदुकोणची एंट्री, प्रेजेंट करणार अवॉर्ड

कुंभ
आज आत्मविश्वासाने आणि समजूतदारपणाने घरातील कोणताही निर्णय घ्याल. आज काही मोठे काम तुमच्या हातात येऊ शकते. तुमच्या मागील कर्जाची परतफेड केल्याने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

मीन
आज तुम्ही स्पष्टपणे विचार करू शकाल आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या सूचनेचे आज कौतुक होईल. जर तुमचा विवाह करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराशी त्याबद्दल बोलण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तब्येत ठीक राहील पण वाहन चालवताना काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी