Horoscope Today, 14 April 2022 : कोणत्या राशीच्या नागरिकांनी तब्येत सांभाळावी, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Horoscope Today 14 April 2022 daily rashibhavishya in marathi : ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या आजचे गुरुवार १४ एप्रिल २०२२ चे बारा राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 14 April 2022 daily rashibhavishya in marathi
राशीभविष्य : गुरुवार १४ एप्रिल २०२२ 
थोडं पण कामाचं
  • कोणत्या राशीच्या नागरिकांनी तब्येत सांभाळावी, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
  • राशीभविष्य : गुरुवार १४ एप्रिल २०२२
  • कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस?

Horoscope Today 14 April 2022 daily rashibhavishya in marathi : ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या आजचे गुरुवार १४ एप्रिल २०२२ चे बारा राशींचे राशीभविष्य. आज चंद्र सिंह राशीत आहे. दुपारी ३.५५ नंतर चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. सूर्य मीन तर गुरु कुंभ राशीत आणि शनि मकर राशीत आहे. केतु वृश्चिक राशीत आहे. सूर्योदयाच्या वेळी चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आहे. वृषभ आणि कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. जाणून घेऊ विस्तृत राशीभविष्य.

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: दुपारी किंवा संध्याकाळी महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे. करार दुपारी ४ नंतर करावे. पांढरा आणि पिवळा रंग शुभ आहे. यथाशक्ती दान करावे. तिळाचे दान लाभदायी आहे.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: तब्येत सांभाळा. राजकारणात यशस्वी व्हाल. हुशारीने बोलाल आणि प्रभाव पाडाल. निळा आणि पांढरा हे शुभरंग आहेत. उडीद दान करा.
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. नोकरी व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी प्रगतीची संधी साधण्याचा दिवस. मकर आणि तुळेच्या लोकांचा लाभ होईल. पांढरा रंग शुभ आहे. 
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीत प्रगतीचा योग आहे. गुरु आणि शनि ग्रहाचा प्रभाव असलेल्यांकडून मोलाची साथ मिळेल. धर्मकार्याचा योग आहे. पिवळा आणि पांढरा हे शुभ रंग आहेत. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. धार्मिक कार्यांसाठी वेळ काढणे हिताचे. नारंगी आणि पांढरा रंग आपल्यासाठी लाभाचा. व्यवसायात लाभ होईल.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: लाल आणि पांढरा हे आपल्यासाठी शुभरंग आहेत. राजकारणात प्रगतीचा योग. बोलून प्रभाव पाडाल. ओळखी वाढवाल. माणसं जोडणे हिताचे. 
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरीत सातत्य आणि प्रामाणिक कष्टांचा लाभ होईल. प्रगती होईल. श्री सुक्ताचे पठण लाभाचे. निळा आणि हिरवा हे शुभरंग.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: गुरु आणि बुधामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. उडदाचे आणि मुगाचे दान करणे हिताचे. श्री सुक्ताचे पठण लाभाचे. राजकारण आणि व्यवसायात प्रगती होईल. शुभ रंग लाल आणि हिरवा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: राजकारणात प्रगतीचा योग. सुखासाठी मर्यादीत संघर्ष करावा लागेल. सप्तश्लोकी दुर्गा पठण हिताचे. हिरवा आणि नारंगी शुभरंग.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रगती होईल. लाभांचा दिवस आहे. कनकधारास्तोत्र म्हणा. हिरवा आणि पांढरा हे शुभरंग
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कौटुंबिक सौख्य लाभेल. तब्येत छान राहील. अरण्यकाण्ड वाचाल तर आणखी लाभ होईल. शुभरंग आहेत पिवळा आणि नारंगी.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. हनुमानबाहुक वाचा. लाल आणि हिरवा हे शुभरंग. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी