Horoscope Today, 14 january 2023: कर्क आणि तुळ राशीतील विद्यार्थ्यांना मिळेल नोकरी; जाणून घ्या इतर राशींचं काय असेल भविष्य

आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Horoscope Today, 14 january 2023
जाणून घ्या कसा असेल 14 जानेवारी 2023 चा दिवस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस
  • वृश्चिक राशीच्या लोकांना सिंह राशीचे मित्र आज तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.
  • मिथून राशीच्या लोकांनी सावध राहिले पाहिजे. त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण होईल आणि वाद होण्याची शक्यता आहे.

Horoscope Today, 14 january 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

मेष  

या दिवशी व्यवसायाशी संबंधित कोणताही नवीन निर्णय काळजीपूर्वक घ्या. अध्यात्माकडे वाटचाल करू शकाल.

वृषभ 

या राशीतून सप्तमाचा चंद्र आणि मिथुन राशीचा रवि व्यवसायात नवीन करारामुळे लाभदायक ठरेल. आज कोणतीही फॅमिली प्लॅन पुढे ढकलणे योग्य नाही. हिरवा आणि जांभळा हे चांगले रंग आहे

मिथुन 

कुटुंबात तणाव निर्माण होईल आणि वाद होण्याची शक्यता आहे. सुखद प्रवासाची शक्यता आहे. पिवळा आणि लाल हे चांगले रंग आहेत.  पिवळा आणि आकाशी रंग शुभ आहेत.

कर्क

राजकीय लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना लाल आणि पिवळा रंग शुभ आहे. 

सिंह 

आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत यशाची वेळ. पैसा येऊ शकतो. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. निळा आणि केशरी रंग शुभ आहे

कन्या 

व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी व्हाल. गणपतीला दुर्वा अर्पण करा. निळा आणि जांभळा हे चांगले रंग आहेत. गाईला पालक खायला द्या आणि मूग दान करा.

तूळ

शुक्र आणि शनि पंचम गोचर करत आहेत.नोकरीमध्ये प्रगतीबद्दल आनंद राहील. आरोग्य लाभासाठी हनुमान बाहुकचा पाठ करा. तसेच राशीच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पांढरा आणि हिरवा रंग चांगला आहे.

वृश्चिक 

 शिक्षण आणि मुलांसाठी गुरु शुभ आहे. आज राजकीय यशाचा दिवस आहे. मेष आणि सिंह राशीचे मित्र आज तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. लाल आणि पिवळे चांगले आहेत. सूर्याला गहू आणि गूळ दान करा.

धनु

आज चंद्र या राशीच्या दशम आणि शुक्र या राशीच्या द्वितीय घरात अनुकूल आहेत. ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा बॉसकडून  आनंदाची बातमी मिळेल. नोकरीबाबत चांगली बातमी मिळेल. हिरवा आणि आकाशी रंग शुभ आहे. 

मकर  

राशीचा स्वामी शनी या राशीमध्ये बुध द्वादशमध्ये शुभ आहे. नोकरीविषयी मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.या राशीच्या लोकांना केशरी आणि लाल रंग शुभ आहे. 

कुंभ 

आजचा दिवस राजकारणात प्रगतीचा आहे. या राशीतून बाराव्या घरात शनि, आणि कन्या राशीतील चंद्र धार्मिक विधींशी संबंधित कामे करुन देण्यास कारणीभूत ठरतील. नोकरीत नवीन कामे सुरू होतील. मंगळामुळे आत्मविश्वास वाढेल. हिरवा आणि पांढरा हे चांगले रंग आहे. 

मीन 

कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे चांगले काम कराल. पैसा येण्याचे लक्षण आहे. आरोग्याच्या बाबतीत आनंदी राहाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी