Horoscope Today, 24 january 2023 : शनि आणि शुक्र हे दोन्ही कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. अशा परिस्थितीत मेष, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे.
व्यापारी वर्गातील लोकांची धनासंबंधी असलेली चिंता आज दूर होईल. जर तुम्ही कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा पूर्ण आठवडा चांगला आहे. नोकरदार वर्गातील लोक त्यांच्या सहकर्मीसोबतचांगले काम करतील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. आज या राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग शुभ आहे.
बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचे ठरवत असाल तर समजून-उमजून निर्णय घ्या. प्रेमवीरासांठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रेमसंबंधामध्ये गैरसमसज होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावानांकडे दुर्लक्ष करू नका. या राशीसाठी हिरवा आणि निळा रंग शुभ आहे.
टीचिंग, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले कार्य आज होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या सहकार्याने नोकरीच्या ठिकाणाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या दूर होईल. आज या राशीसाठी आकाशी आणि नारंगी रंग शुभ आहे.
करिअर आणि व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे शुभचिंतकांशी एका चर्चा करा. भावूक होऊन कोणताच निर्णय घेऊ नका. दशम गुरूमुळे यश मिळणे सोपे आहे. आपल्या मुलाच्या लग्नाबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. नवीन व्यावसायिक प्रकल्पाकडे वाटचाल करू शकता. आजसाठी हिरवा आणि निळा रंग शुभ असेल.
आज नोकरीमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरुन लक्ष हटू शकते. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान होऊ शकतो.
प्रवासाचे योग येतील. धार्मिक बाबी, घरात शुभ समारंभ घडतील. भाग्यातील रवी नोकरीत बढतीचे संकेत देत आहे. कोर्ट-कचेरी, बँकिंग क्षेत्र आणि सल्लागारांशी संबंधित लोकांसाठी हा दिवस नाहीतर संपूर्ण आठवडाच चांगला जाणार आहे. आजसाठी गुलाबी रंग शुभ असणार आहे.
या राशीतील लोक आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करतील. तर अष्टमातील ग्रह सावध राहण्याचे संकेत देत आहेत. मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत कराल. तर काहींना आपल्या मुलांच्या प्रगती अभिमान वाटेल. आजसाठी या राशीला लाल आणि जांभळ रंग शुभ असेल.
प्रिय व्यक्तीशी अचानक भेट होऊ शकते. प्रेमसंबंधात तीव्रता राहील. लव्ह पार्टनरसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. या राशीसाठी लाल रंग शुभ असेल.
अधिक वाचा : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?
या राशीमधील आयटी, शिक्षण क्षेत्र, माध्यमामधील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. प्रेम संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज दूर होतील. करिअर व्यवसायातही चांगली प्रगती दिसून येईल. आजसाठी या राशीच्या लोकांना नारंगी आणि पिवळा रंग शुभ असेल.
कठीण प्रसंगी तुमचा जीवनसाथी तुमच्या पाठीशी उभा राहील. व्यापाऱ्यांना व्यवहारात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंध असतील तर त्यात तुम्ही विचारपूर्वक पुढे जा. कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. आज या राशीसाठी पिवळा आणि निळा रंग शुभ असेल.
अधिक वाचा : वकिलांच्या टंचाईमुळे भारतात 63 लाख केस प्रलंबित
प्रेमसंबंध घट्ट होतील. जोडीदार तुमच्यासोबत उभा राहिल्यानंतर तुमचे मनोबल वाढेल. आज या राशीच्या लोकांसाठी आकाशी रंग शुभ असेल.
अधिक वाचा : 21 परमवीर सैनिकांच्या नावे ओळखली जाणार अंदमान निकोबारची बेटे
मीन
आपले शब्द आणि वाणीवर नियंत्रण ठेवा नाहीतर तुमचे काम खराब होऊ शकते. आज दिवस संतती आणि सामाजिक जीवनात कष्ट घेऊन येईल.प्रेमप्रकरणात कोणत्याही प्रकारचे गैरसमज वाढू देऊ नका. आज या राशीच्या लोकांसाठी आकाशी आणि पांढरा रंग शुभ असेल.