Horoscope Today 25 january 2023 : आज चंद्र कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात असल्याने लवकरच नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज दशम गुरू आणि अकरावा चंद्र नोकरीसाठी अनुकूल आहे. चला तर जाणून घेऊया 12 राशींचे काय असेल भविष्य (Horoscope Today, 25 january 2023 : know your rashibhavisya)
अधिक वाचा : फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी रश्मी वहिनींकडे पाठवला निरोप
आज शुक्र आणि सूर्य तसेच अकरावा चंद्र हे तुमच्या व्यवसायात मोठा लाभ देऊ शकतात. नोकरीत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. आज या राशीच्या लोकांसाठी पिवळा आणि पांढरा रंग शुभ आहे.
अधिक वाचा : Pathan : Advance बुकिंगमध्ये 4.30 लाख तिकिटांची विक्री
आजचा दिवस या राशीतील पालकांसाठी खूप आनंदाचा आहे. कारण त्यांच्या मुलांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायात अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आज या राशीच्या लोकासांठी पिवळा आणि केसरी रंग शुभ आहे.
आजचा दिवस या राशीतील व्यावसायिकांसाठी चांगला आहे. दहावा गुरु आणि अकरावा चंद्र नोकरीसाठी अनुकूल आहे. प्रवासाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. आज नारंगी आणि पिवळा रंग शुभ आहे.
अष्टम आणि गुरू हे मकर राशीत आहेत. या राशीतील काहीजण धार्मिक कार्यक्रमात व्यस्त राहतील. आज पांढरा आणि निळा रंग शुभ आहे.
अधिक वाचा : ठाकरे गट बॅनर लावत म्हणाले... साहेब मी गद्दार नाही
गुरू आठव्या आणि सूर्य-शुक्र शुभ राहणार आहे. या राशीत नवव्या स्थानी असलेला चंद्र हा गोचर करत असून तो भाग्यसाठी शुभ आहे. चंद्र आणि गुरू हे नोकरीमध्ये नवीन संधी मिळवून देतील. परिवारासोबत प्रवास होण्याची शक्यता आहे. आज हिरवा आणि आकाशी रंग शुभ आहे.
रवि-शुक्र व्यवसायाशी संबंधित रखडलेल्या कामांमध्ये लाभ देतील. सातव्या स्थानी असलेला गुरु जीवन जोडीदारासाठी लाभदायक आहे. शनि मकर राशीत असल्यामुळे राजकारण्यांसाठीही आजचा दिवस शुभ आहे. त्यामुळे राजकारणात यश मिळेल. आजसाठी निळा आणि हिरवा रंग शुभ आहे.
आरोग्यासाठी सूर्य शुभ आहे.नोकरीबाबत काही तणाव संभवतो. जोडीदार चांगल्या मूडमध्ये राहतील. तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असेल. आज या राशीसाठी पांढरा रंग शुभ आहे.
आज आयटी आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज आयटी आणि बँकिंगच्या नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. आज या राशीसाठी हिरवा आणि आकाशी रंग शुभ आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी दिवस कष्टाचा असेल. काही मालमत्तेवरून कुटुंबात वाद होऊ शकतात. यावरून भावांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. संध्याकाळपासून रात्री जवळच्या प्रवासाची शक्यता आहे. आज या राशीसाठी आकाशी आणि लाल रंग शुभ आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस प्रतिष्ठा वाढवणारा असेल. यासोबतच गुरु सुद्धा तिसऱ्या भावात असेल, त्यामुळे चांगली संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.आज लाल आणि पिवळा रंग शुभ आहे.
या राशीच्या लोकांसाठी दिवस कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारीचा आणि धार्मिक कार्यात अधिक व्यस्त असणार आहे. तुमचा पैसा कोणत्याही धार्मिक प्रवासात खर्च होऊ शकतो. आज आकाशी आणि हिरवा रंग शुभ असेल.
या राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. या राशीत सूर्य अकरावा स्थानी आहे आणि गुरु शुभ आहे. यामुळे राजकारणात प्रगती होईल. आर्थिक आणि आयटी नोकरीत लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेतूनही उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. आजसाठी पिवळा आणि लाल रंग शुभ आहे.