मुंबई: जेव्हा ही नवीन वर्ष सुरू होते आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे जाणून घेण्याची इच्छा असते की त्यांच्यासाठी हे नवीन वर्ष कसे असणार आहे? म्हणजेच नव्या वर्षातील बंद मुठीत त्याच्यासाठी काय असेल? नव्या वर्षात ते काय मिळवणार आणि काय गमावणार? त्यांच्या जीवनात कोणते सुखद बदल येतील? कोणत्या समस्या येतील? त्यांची आर्थिक स्थिती कशी राहील? कौटुंबिक जीवन कसे राहील? प्रेम जीवन कसे राहील? करिअरमध्ये कोणत्या गोष्टी मिळतील? व्यापार कसा चालेल? नोकरी मिळणार की नाही? प्रमोशन होणार की नाही? कुटुंबात कसा आनंदीआनंद राहील. घरात लग्नाचे सूर कधी वाजणार? असे अनेक प्रकारचे प्रश्न प्रत्येकाच्या मनात सतावत असतात.
अंकज्योतिषानुसार आपल्या जीवनात मुख्य तीन प्रकारचे अंक प्रभावित करतात. यात पहिला मूलांक, दुसरा भाग्यांक आणि तिसरा नामांक. एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्यांच्या जन्मतिथीवर अवलंबून असतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा जन्म २० तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक २ हा आहे. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतिथी २ नोव्हेंबर १९६५ आहे तर सर्व अंक जोडून २५ यांची बेरीज केली असता उत्तर येते ७. म्हणजेच त्यांचा भाग्यांक झाला ७.
ज्यांची जन्मतारीख २, ११, २० आणि २९ इतकी आहे त्यांचा मूलांक २ असतो. २०२२ हे वर्ष २ मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगले जाणारे असणार आहे. युवकांना या वर्षात कला, साहित्य, मीडिया अथवा संगीत क्षेत्राशी जोडलेले असतील त्यांना यश मिळू शकते. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल. लेखन क्षेत्रातील कार्यरत लोकांना यश पुढील पायरीवर नेईल. एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. ज्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी नवीन संधी चालून येतील. आईचे आरोग्य सुधारेल.
सासरच्या मंडळीकडून सहकार्य लाभेल. मुलीच्या आरोग्याबाबतची चिंता दूर होईल. नव्या वाहन खरेदीचा योग आहे. सुख-सुविधेत वाढ होईल. कार्यस्थळी स्थिती मजबूत होईल. उन्नतीचे योग संभवतात. वैवाहिक जीवन सुखी राहील. कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन होऊ शकते. घरात शभ कार्य घडेल.
मनासारखी नोकरी मिळेल. २०२२ हे वर्ष नवीन संधींचे आहे. या वर्षात आपल्या कमतरता सुधारण्यासाठी तसेच व्यक्तिगत आणि व्यवसायिक जीवनात सुधारण्याची नवी संधी मिळेल. २०२२च्या सुरूवातीस जुनी प्रकरणे सोडवली जाऊ शकतात. वर्षाच्या मध्यापर्यंत प्रभावशाली स्थिती असेल. सामाजिक कार्यात सक्रिय रूपाने सहभागी व्हाल.
शिक्षण क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास जे विद्यार्थी डिझायनिंग, मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत यश लिहिले आहे. ज्यांना परेदशी जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे आहे ते २०२२वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपले लक्ष्य गाठू शकतात.
प्रेमसंबंधांच्या प्रकरणात २०२२ हे वर्ष खूप उत्तम आहे. जवळच्या व्यक्तींसोबतचे प्रेमसंबंध, जिव्हाळा वाढेल. आपल्या जुने मित्र अथवा प्रियकराशी भेटी संभवतात. २०२२ हे वर्ष तुम्हाला जुन्या चुका सुधारण्यासाठी उत्तम काळ आहे. ज्यांच्यासोबत तुमचा वाद झाला होता त्या व्यक्ती नवीन वर्षात पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील. प्रवासाचे नियोजन कराल. एकूण पाहता २ मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी येणारे वर्ष हे अनेक प्रकारच्या संधी निर्माण करणारे तसेच आशादायी असणार आहे.