मुंबई: अनेकदा लोकांना झोपेत स्वप्न(dream) बघायची सवय असते. काही वेळेस ही स्वप्ने आपल्या आयुष्यातील घटनांशी निगडित असतात तर अनेकदा स्वप्नात अशा काही घटना दिसतात ज्या खऱ्या जीवनात(life) कधी घडल्याच नाहीत. असे होऊ शकते की एखाद्या स्वप्नाचा अर्थ काही खास असेल आणि हे भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असेल. विज्ञानाच्या मते स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूची एक क्रिएटिव्हिटी असते जे आपण बंद डोळ्यांनी करत असते. कधी कधी स्वप्नात दिसणार गोष्टी आपल्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित असतात ज्या वास्तवात आपण दुर्लक्ष करतो. मात्र याचे कनेक्शन आपल्या मन आणि मेंदूशी असते. If you see this in your dream then be alert
अधिक वाचा - मुंबई शहर बनले 'ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड'
असे गरजेचे नाही की प्रत्येक स्वप्नाचा काही अर्थ असेल. मात्र हे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही की काही स्वप्नांचा खास अर्थ असेल. अनेकदा आपण स्वप्नात पाहतो की आपले पूर्वज आपल्याकडे बघून हसत आहेत याचा अर्थ त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम आहे. तसेच अनेकदा आपण स्वप्नात देवाला पाहतो याचा अर्थ देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. दरम्यान, अशीही काही स्वप्ने असतात ज्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अथवा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असेल.
असे मानले जाते की स्वप्नात जर तुम्ही खास व्यक्तीचा मृत्यू पाहिला तर या तुमच्या प्रियजनाच्या आजाराचे संकेत असावेत. हे स्वप्न म्हणजे तुम्ही स्वत: अथवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आगामी शारिरीक जोखीमबाबत जागरूक राहण्यासाठी दिलेला संकेत असावा. त्यामुळे असे जर काही स्वप्न पाहिले तर आरोग्याच्या प्रती जागरूक राहण्याची गरज आहे.
पडण्याची स्वप्ने अनेकदा नियंत्रण गमावण्याच्या भीतीने उत्पन्न होतात. जर असे स्वप्न पडले असेल तर तुम्हाला वर्तमानातील स्थितीची मूल्यांकन केले पाहिजे आणि समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्वप्न तु्म्हाला असुरक्षा, अस्थिरता आणि चिंतांचे संकेत देतात. असे कोणतेही स्वप्न आल्यास सतर्क राहा की आपल्या करिअरमध्ये चढ-उतार येणार आहेत.
स्वप्नात एखादे धान्य बघणे हे चांगले संकेत असतात मात्र जर तुम्ही स्वप्नात तांदळाचा ढीग पाहिला असेल तर तुमची धनहानी होऊ शकते. असे स्वप्न दिसल्यास तुमची जमा केलेली पुंजी चुकीच्या हातात जाणार आहे.
अधिक वाचा - आठवड्यातून फक्त ३ दिवस कार्यालयात जावे लागणार, पगारही वाढणार
पाणी हे भावनांचे प्रतीक असते. यासाठी तुम्ही जर स्वत:ला पाण्यात बुडत संघर्ष करताना पाहिले असेल तर तुमच्या भावना तुम्हाला जीवनातील या क्षेत्रात मदतीसाठी बोलावत आहेत जिथे तुमचे नियंत्रण नसते. पाण्यामध्ये बुडणे आपल्या करिअरच्या असमर्थतेचे संकेत देतात.
हे ऐकायला थोडे विचित्र वाटते ना? मात्र हो जर तुम्ही स्वप्नात स्मार्टफोन पाहत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. यामुळे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला गमावू शकता अथवा आयुष्यात धनहानी होण्याची शक्यता असते.