Dream Astrology: स्वप्नात दिसली ही पांढरी गोष्ट तर समजा तुम्हाला लागली लॉटरी

भविष्यात काय
Updated Apr 19, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dream Astrology: स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या काही सफेद गोष्टी सुखद भविष्याचे संकेत देतात. हे स्वप्न दिसणे म्हणजे भरपूर पैसा, सुख मिळण्याचा इशारा असतो. 

dream
स्वप्नात दिसली ही पांढरी गोष्ट तर समजा तुम्हाला लागली लॉटरी 
थोडं पण कामाचं
  • जर तुमच्या स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहेत.
  • स्वप्नात जर हत्ती दिसला तर तुम्हाला केवळ भरपूर पैसेच मिळणार नाहीत तर मान-सन्मानही मिळणार आहे. 
  • स्वप्नात मधमाशाचे पोळे दिसणेही अतिशय शुभ असते.

मुंबई: स्वप्नशास्त्रांना(dream) काही स्वप्ने ही अतिशय शुभ सांगितली गेली आहे.. असं म्हणतात की अशा प्रकारची स्वप्ने ज्यांना पडतात त्यांना खूप पैसा मिळतो. त्यांच्या आयुष्यात खूप सुख येते. तुम्ही असंही म्हणू शकता की त्यांचे नशीब उघडते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शुभ स्वप्नांबद्दल सांगणार आहोत. 

अधिक वाचा - हा झकास पोर्टेबल एसी घर करेल थंडगार, फिरवा घरभर व्हा कूल

खूप शुभ असतात ही स्वप्ने

स्वप्नात कमळाचे फूल बघणे - कमळाचे फूल धनदेवता लक्ष्मी मातेचे प्रिय फूल आहे. जर तुमच्या स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहेत. तसेच तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. 

स्वप्नात हत्ती दिसण्याचा अर्थ  - हिंदू धर्मात हत्तीला अतिशय शुभ मानले आहे. वास्तुशास्त्रानुसारही हत्तीला अतिशय शुभ मानले असून घरात हत्तीची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वप्नात जर हत्ती दिसला तर तुम्हाला केवळ भरपूर पैसेच मिळणार नाहीत तर मान-सन्मानही मिळणार आहे. 

स्वप्नात फळांनी लगडलेले झाड दिसणे - असे स्वप्न पडल्यास तुम्ही लवकरच श्रीमंत होणार ही लक्षणे आहेत. जर एखाद्या व्यापाऱ्याला असे स्वप्न पडले तर त्याला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता असते. 

स्वप्नात मधमाशाचे पोळे दिसणे - स्वप्नात मधमाशाचे पोळे दिसणेही अतिशय शुभ असते. याचाच अर्थ आयुष्यात भरपूर सुख मिळणार आहे. 

स्वप्नात स्वत: दूध पिताना पाहणे - स्वप्नात स्वत:ला दूध पिताना पाहण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. हे धनलाभाचे संकेत असतात. 

अधिक वाचा - गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे शुन्य मृत्यू

स्वप्नात थोबाडीत मारताना पाहणे शुभ नाही

एखाद्या वव्यक्तीने स्वप्नात जर एखाद्याला थोबाडीत मारताना पाहिले तर ते शुभ असते का अशुभ. याचे उत्तर हे शुभ संकेत नाहीत. याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतेय. याचाच अर्थ तुम्ही विनाकारण एखाद्या वादात अडकू शकता. तसेच शत्रू तुमच्यावर प्रभावी ठरू शकतो. तुमच्याविरुद्ध एखादा कटही रचला जाऊ शकतो. आर्थिक तसेच शारिरीकही नुकसान होऊ शकते. यासाठी सतर्क राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी