Shrawan 2022 Zodiac: श्रावणमध्ये या ३ राशीचे उजळणार भाग्य; भगवान शंकराच्या कृपेने प्रत्येक कामात मिळेल यश

भविष्यात काय
Updated Jun 16, 2022 | 12:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shrawan 2022 Zodiac । यंदा श्रावण महिना १४ जुलै पासून सुरू होत आहे आणि १२ ऑगस्टला संपणार आहे. श्रावण हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित आहे.

in month of Shravan, by the grace of Lord Shiva, the luck of these 3 zodiac signs will shine
श्रावमध्ये भगवान शंकराच्या कृपेमुळे या ३ राशींचे चमकणार नशीब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यंदा श्रावण महिना १४ जुलै पासून सुरू होत आहे आणि १२ ऑगस्टला संपणार आहे.
  • यावेळी श्रावण महिन्यात ४ सोमवार असतील.
  • कर्क राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे.

Shrawan 2022 Zodiac । मुंबई : यंदा श्रावण महिना १४ जुलै पासून सुरू होत आहे आणि १२ ऑगस्टला संपणार आहे. श्रावण हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित आहे. देवशयनी एकादशीही श्रावण महिन्यात येते. या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात आणि तेव्हापासून भगवान भोलेनाथ चार महिने या जगाचा विस्तार चालवतील. यावेळी श्रावणमध्ये एकूण ४ सोमवार येत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ३ राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा असेल. (in month of Shravan, by the grace of Lord Shiva, the luck of these 3 zodiac signs will shine). 

अधिक वाचा : तीन शब्दांचा राजीनामा Viral

या ३ राशीचे उजळणार भाग्य

  1. कन्या राशी - कन्या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात आनंदाने भरलेल्या भेटवस्तू मिळू शकतात.तुम्ही या महिन्यात गुंतवणूक करू शकता. अडकलेले पैसे लवकर परत मिळू शकतात.तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमचे अस्तित्व निर्माण करू शकाल. विदेशी प्रवासाचीही शक्यता आहे.
  2. कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांच्या कामातील दीर्घकाळचे अडथळे दूर होतील आणि यश मिळेल.संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे शुभ राहील. व्यवसायात चांगली कमाई होण्याची शक्यता वाढेल.
  3. मेष राशी - ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे. त्यांचे आर्थिक संकट दूर होऊन भगवान शंकराच्या कृपेने धनप्राप्ती होईल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंब, नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते.

श्रावण महिन्यातील चार सोमवार

पहिला श्रावण सोमवार - १८ जुलै
दुसरा श्रावण सोमवार - २५ जुलै
तिसरा श्रावण सोमवार - १ ऑगस्ट
चौथा श्रावण सोमवार - ८ ऑगस्ट

श्रावण महिन्याचे महत्त्व 

श्रावण महिना भगवान शंकर यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात केलेली महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. खासकरून श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी