Shani Gochar 2022 Sade Sati And Dhaiya: नवी दिल्ली: शास्त्रानुसार शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिदेव (Shani Dev) माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. त्याचप्रमाणे जेव्हा शनि ग्रह आपली घर बदलत असतो तेव्हा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतात. ज्योतिष (astrology) शास्त्रानुसार 23 ऑक्टोबर रोजी शनि मकर राशीत मार्गक्रम करत आहेत. 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत शनि प्रवेश करणार आहेत. शनिचे हे संक्रमण अनेक राशींसाठी चांगले आहे आणि अनेक राशींसाठी समस्या वाढवू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या राशींसाठी शनिचे संक्रमण चांगले राहील. (In the new year, the grace of Lord Shani will remain on these signs)
अधिक वाचा : चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी सचिन तेंडूलकर भेटतो तेव्हा…
पंचांगानुसार शनिदेव सध्या मकर राशीत जात आहेत. 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.02 वाजता ते मकर राशीतून निघून कुंभ राशीत जाईल. अशा स्थितीत अनेक राशींना साडेसतीपासून मुक्ती मिळणार आहे.
अधिक वाचा : पैसामुळे लग्न रखडलंय? मग बँक उडवेल लग्नाचा बार, असा करा अर्ज
ज्योतिष शास्त्रनुसार शनि मकर राशीवर असल्यामुळे यावेळी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरू आहे. मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर ढैय्या आहे. तर कुंभ राशीबद्दल म्हटलं तर 24 जानेवारी 2022 पासून शनिची साडेसाती चालू आहे. ही साडेसाती 3 जून 2027 रोजी संपणार आहे. 2023 मध्ये या राशींना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. ज्योतिष्यानुसार, शनि 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अशा स्थितीत तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांना शनिच्या धैय्यापासून मुक्ती मिळेल.
यासोबतच धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. तर काही राशींवर शनिची साडेसाती सुरू होणार आहे. जानेवारी 2023 मध्ये कुंभ राशीत शनीच्या प्रवेशामुळे मीन राशीत शनिच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल. यासोबतच मकर आणि कुंभ राशीत साडेसाती राहील.