Astrology Numerology: तुमचा मूलांक ७ आहे का? पाहा कशा असतात या व्यक्ती

भविष्यात काय
Updated Dec 23, 2021 | 15:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology: आपल्या भावना प्रत्येकासमोर नीट व्यक्त न करता आल्याने यांचा मित्र परिवार कमी असतो. आपले म्हणणे सर्वांसमोर दृढतेने बोलण्यास घाबरत नाहीत. 

numerology
तुमचा मूलांक ७ आहे का? पाहा कशा असतात या व्यक्ती 
थोडं पण कामाचं
  • मूलांक ७ असलेल्या व्यक्ती मनाच्या स्वच्छ असतात.
  • ज्या व्यक्तींचा मूलांक ७ आहे त्यांच्यासाठी ७,१६ आणि २५ तारीख आणि रविवार, सोमवार आणि गुरूवार हे दिवस शुभ असतात.
  • मूलांक ७ अलेल्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन समस्यांनी भरलेले असते

मुंबई: अंकशास्त्रात एक ते नऊ पर्यंत मूलांक निर्धारित करण्यात आले आहेत. यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची झलक पाहायला मिळते. कोणत्याही व्यक्तीची जन्मतिथी हा त्या व्यक्तीचा मूलांक असतो. यासाठी ज्या व्यक्तींची जन्मतारीख ७,१६ आणि २५ तारीख असते त्यांचा मूलांक ७ असतो. ज्यांचा मूलांक ७ असतो त्यांचा स्वामी ग्रह केतु असतो. त्यांना दुसऱ्यांचे मन वाचता येते. यामध्ये हे लोक माहीर असतात. 

चांगले प्रेंझेंटेशन देतात ७ मूलांक असलेल्या व्यक्ती

मूलांक ७ असलेल्या व्यक्ती मनाच्या स्वच्छ असतात. अनेक लहान गोष्टी त्यांना दु:खी करतात. प्रेम प्रकरणात यांना त्यांचे भाग्य साथ देत नाही. याच कारणामुळे यांचे प्रेम आणि दाम्पत्य जीवनात चढ-उतार राहतात. आपल्या भावना कोणासमोर व्यक्त न करता आल्याने त्यांच्या मित्रांची संख्या कमी असते. दरम्यान अनेक कारणामुळे यांच्या बोललेल्या गोष्टी मनावर घेतल्या जातात. या व्यक्ती नेहमी आपल्याबाबत विचार करतात. छोट्या-छोट्या गोष्टी गंभीरतेने घेतात ही त्यांची कमजोरी आहेत. 

ज्या व्यक्तींचा मूलांक ७ आहे त्यांच्यासाठी ७,१६ आणि २५ तारीख आणि रविवार, सोमवार आणि गुरूवार हे दिवस शुभ असतात. कोणत्याही कामाची सुरूवात या दिवशी अथवा या वारांना केल्यास यश मिळण्याची शक्यता जास्त असते. रंगांबाबत बोलायचे झाल्यास हलका पिवळा आणि लाल यांचे अनुकूल असतात. 

वैवाहिक जीवनात तणाव

मूलांक ७ अलेल्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन समस्यांनी भरलेले असते. यांचे वैवाहिक जीवन चढ-उताराने भरलेले असते. आपल्या मनातील भावना दुसऱ्यांसमोर व्यक्त करण्यास असमर्थ असल्याने यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांचा मूलांक १,२,३,५,७ आणि ९ मूलांक असलेल्या व्यक्ती यांचे मित्र होतात. या व्यक्ती खूप नशीबवान असतात. 

या व्यक्ती खूप बुद्धिमानी असतात. तसेच या आयुष्यात खूप धन कमावतात. या व्यक्ती चांगले लेखक, डॉक्टर, जज, ज्योतिषी आणिि सरकारी अधिकारी बनतात. कल्पनाशक्ती आणि आपल्या अभिव्यक्तीच्या कुलपूर्व अभिव्यक्ती केल्या कारणाने लेखक, कवी म्हणून अधिक सफल होतात. याशिवाय अध्यापक, न्यायाधी, सलाग्गार तथा गाईड अशी कामे करणारी असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी