Dream Interpretation: स्वप्नात या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते, भरपूर पैसा मिळण्याचे आहेत संकेत

भविष्यात काय
Updated Jan 04, 2022 | 06:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dream Interpretation: अनेक वेळा आपण स्वप्नात जे पाहतो ते आपल्या लक्षात राहात नाही. पण कधी कधी काही स्वप्ने अशी असतात, जी दिवसभर मनात असतात

It is considered auspicious to see these things in a dream
स्वप्नात या गोष्टी पाहिल्याने तुम्ही व्हाल मालामाल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वप्नात या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते
  • स्वप्नात उंदीर पाहणे शुभ मानले जाते, भरपूर पैसा मिळतो
  • तुटलेल्या वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वप्नात पाहिल्याने पैशाची टंचाई दूर होते.

Dream Interpretation: अनेकवेळा आपण स्वप्नात जे पाहतो ते लक्षात राहात नाही. पण कधी-कधी काही स्वप्ने अशी असतात, जी दिवसभर मनात राहतात. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्ने भविष्यातील घटनांचे शुभ किंवा अशुभ संकेतही देतात. स्वप्न शास्त्रामध्ये अशा काही स्वप्नांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे आगमन शुभ संकेत देते. हे स्वप्न आयुष्यातील प्रत्येक मोठ्या इच्छा पूर्ण होण्याचे आणि भरपूर पैसे मिळण्याचे संकेत देते. जाणून घेऊया त्या स्वप्नांबद्दल, ज्यांना खूप शुभ मानले जाते.

स्वप्नात खालील गोष्टी पाहिल्यास तुमचं नशिब पालटेल


1.जर तुम्ही स्वप्नात उंदीर पाहत असाल तर हे शुभ लक्षण आहे. उंदीर दिसणे पैसे अचानक धनलाभ होण्याचा संकेत आहे. या पैशामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होते.

2.स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात लहान मूल किंवा मुलगी नाचताना पाहणे हे जीवनात धन आणि वैभव वाढवण्याचे लक्षण आहे.

3. धनत्रयोदशी-दिवाळीसारख्या शुभ मुहूर्तावर घरामध्ये रिकामी भांडी आणणे अशुभ आहे, असे म्हटले जाते, परंतु स्वप्नात याच्या उलट घडते. स्वप्नात रिकामी भांडी पाहणे खूप चांगले आहे. हे स्वप्न पैसे मिळण्याचे संकेत देते.

4.स्वप्नात देवता पाहिल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे स्वप्न शास्त्र सांगते. 

5.घरात तुटलेल्या वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणे वास्तूमध्ये दोष असल्याचे सांगितले जाते. पण स्वप्नात इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेले किंवा तुटलेले दिसणे शुभ असते. हे पैशाची टंचाई संपल्याचे सूचित करते.

6.स्वप्नात झाडू पाहणे म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करणे होय. आणि असे स्वप्न दिसल्यास प्रथम आई किंवा पत्नीला त्या स्वप्नाबद्दल सांगितल्याने फळ अनेक पटींनी वाढते.

7.त्याचबरोबर स्वप्नात कमळाचे फूल दिसणे देखील संपत्तीत वाढ दर्शवते.

8.स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गायीचे शेण, शेण बनवताना किंवा ते स्वतः बनवताना पाहणे खूप चांगले आहे. अशा स्वप्नामुळे नशीब चमकते.असे म्हटले जाते

9. स्वप्नात मृत शरीर पाहणे करियर-व्यवसायासाठी चांगले आहे. हे स्वप्न प्रगती आणते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी