Vastu Tips for Clock : घरात ठेवू बंद पडलेलं घड्याळ ठेवणं असतं अशुभतेचं लक्षण, भिंतीवर टांगताना दिशेकडे द्या लक्ष

आपल्या सर्वांच्या घरी भिंतीवर एक घड्याळ टांगलेले असते. घड्याळ वेळ सांगण्याचे काम करते, पण घड्याळ वेळेसोबतच आणखी अनेक संकेत देत असते. वास्तुमध्ये घड्याळाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जर घड्याळ चुकीच्या पद्धतीने टांगले गेले तर त्याचे नुकसान देखील होऊ शकते. असे म्हणतात की आपले जीवन वेळेशी निगडीत आहे, त्यामुळे घड्याळाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.

Keeping a closed clock in the house is a sign of bad luck
घरात ठेवू बंद पडलेलं घड्याळ ठेवणं असतं अशुभतेचं लक्षण  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दारावर घड्याळ लावल्याने तणाव वाढू शकतो.
  • वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणतेही घड्याळ बंद असेल किंवा काम करत नसेल तर ते घरही निर्जीव बनते.
  • दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने पैसा व्यर्थ जातो. यामुळे घरात संकटे निर्माण होतात आणि नकारात्मक वातावरण निर्माण होते.

Vastu Tips For Wall Clock At Home: आपल्या सर्वांच्या घरी भिंतीवर एक घड्याळ टांगलेले असते. घड्याळ वेळ सांगण्याचे काम करते, पण घड्याळ वेळेसोबतच आणखी अनेक संकेत देत असते. वास्तुमध्ये घड्याळाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जर घड्याळ चुकीच्या पद्धतीने टांगले गेले तर त्याचे नुकसान देखील होऊ शकते. असे म्हणतात की आपले जीवन वेळेशी निगडीत आहे, त्यामुळे घड्याळाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणतेही घड्याळ बंद असेल किंवा काम करत नसेल तर ते घरही निर्जीव बनते. तेथे नेहमीच रोग राहतात. पैशाचीही कमतरता असते, त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नका. घड्याळाशी निगडीत काही साध्या गोष्टींची काळजी घेतली, तर ते तुमचा वाईट काळही चांगल्यामध्ये बदलू शकतो.

दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका

वास्तूनुसार घराची दक्षिण दिशा स्थिर मानली जाते. या दिशेने पाहिल्यास प्रगतीची शक्यता कमी होऊ शकते. या दिशेला घड्याळ लावणे डोक्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने पैसा व्यर्थ जातो. यामुळे घरात संकटे निर्माण होतात आणि नकारात्मक वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा हा यमाचा कोपरा मानला जातो. त्यामुळे घड्याळ या दिशेला ठेवल्यास तेथे राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होतो. 

दरवाजावर लावू नका

दारावर घड्याळ लावल्याने तणाव वाढू शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच अनेकजण आपल्या घरात असे घड्याळ लावतात, जे आत प्रवेश करताच पहिली नजर तिकडे जाते. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी