Palmistry: आपल्या हाताची तर्जनी आणि मध्यमा बोट बरोबरीचं असेल, तर पाहा काय होतो त्याचा अर्थ

भविष्यात काय
Updated Jun 25, 2019 | 17:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

हस्तरेषा आणि कुंडली याशिवाय आपल्या शरीरातील अनेक अवयव नशीब आणि भविष्याबद्दल संकेत देत असतात. आपल्या हातांची बोटं त्यापैकीच एक आहे. जाणून घेऊया बोटांमुळे भविष्य कसं माहिती होतं ते, त्याचा अर्थ...

Hastrekha shastra
आपल्या हातांची बोटं असं सांगतात भविष्य, जाणून घ्या अर्थ  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: हस्तरेषाशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रांमध्ये आपल्या हातांची ठेवणही खूप काही सांगून जात असते. अनेक वेळा हातांची बोटंच कधी कधी आपल्या भाग्योदयाचं कारण बनतात. तर कधी-कधी आपल्यावरील संकट आणि वाईट काळही बोटांच्या आकारमानावरून कळून येतो. आज आपण हातांच्या बोटाबद्दल जाणून घेऊया. हाताचे मध्यमा आणि तर्जनी व्यक्तीचा स्वभाव आणि भाग्योदयाबद्दल माहिती देतात. हे बोटं व्यक्तीच्या भविष्याची माहिती देतात.

ही दोन्ही बोटं म्हणजे आपआपल्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करतात. इंडेक्स फिंगर म्हणजेच तर्जनी आपल्या अंगठ्याच्या बाजूचं बोट गुरू ग्रहाचं बोट असतं. तर हाताचं मधलं बोट शनी ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणून या दोन्ही बोटांचं महत्त्व ज्योतिषशास्त्रामध्ये खूप आहे. तसं तर सामान्यपणे तर्जनी ही मधल्या बोटापेक्षा आकारात लहान असते.

जाणून घेऊया या दोन्ही बोटांमधील ज्योतिषाचा अर्थ...

  1. हातांच्या बोटांमध्ये जर कुणाचं मधलं बोट आणि तर्जनी हे उंचीच्या बाबतीत एकसारखे असतील तर असे बोट असणारा व्यक्ती खूप रागीट असतो. त्याला स्वत:च्या पुढे कुणी गेलेलं चालत नाही. त्यामध्ये अभिमान खूप भरलेला असतो.
  2. हाताच्या मधल्या बोटापेक्षा जर तर्जनी लांब असेल तर अशी व्यक्ती आर्थिक बाबतीत खूप सक्षम असते. पैशाची कमतरता अशा व्यक्तीला कधीच भासत नाही. असे लोक खूप मोठे अधिकारी किंवा बिझनेसमन होतात आणि खूप नाव कमावतात.
  3. ज्यांची तर्जनी खूप लहान असते असे लोक कोणत्याही कामात आपलं मन गुंतवू शकत नाही, हेच कारण आहे की ते कोणतंही काम नीट करू शकत नाही. अशा लोकांच्या मनात आत्मविश्वासाची खूप कमतरता असते आणि त्यांचं स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा पण कमीच असते.
  4. जर आपल्या हातांची तिन्ही बोटं म्हणजे तर्जनी, मध्यमा आणि अनामिका   (इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर) एकसारखे असतील, एकाच उंचीचे तर असे लोक खूपच भाग्यवान असतात. अशा व्यक्तींना समाजात एक विशेष दर्जा प्राप्त झालेला असतो. त्यांचा प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो. असे लोक खूप हुशार आणि विद्वान असतात आणि तेवढेच समाधानी सुद्धा असतात. तर याविरूद्ध म्हणजे जर कुणाच्या हाताच्या तर्जनी पेक्षा अनामिका खूप लहान असेल तर असे लोक कोणत्याही परिस्थितीत असले तरीही तक्रार करत नाही. प्रत्येक ठिकाणी ते स्वत:ला सामावून घेत असतात.
  5. जर तर्जनी आपल्या अनामिकेपेक्षा लांब आणि मध्यमा पेक्षा लहान असेल तर असे लोक अति उत्साही असतात. हे लोक उत्साहाच्या भरात असे काही काम करतात की, कधीकधी त्यामुळे त्यांनाच खूप नुकसान सहन करावं लागतं. असे लोक अति उत्साहाच्या भरात पैशाच्या व्यय खूप करतात आणि त्यांचे झालेले काम बिघडतात.

 

आपल्या बोटांबद्दल ही माहिती बघून आपण स्वत:चं व्यक्तीमत्त्व ओळखू शकतो आणि ज्योतिष्यानुसार आपल्या भाग्याबद्दलही बोटांद्वारे कळू शकतं. सोबतच आपल्यातील कमतरता दूर करून आपला भाग्योदयही करून घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Palmistry: आपल्या हाताची तर्जनी आणि मध्यमा बोट बरोबरीचं असेल, तर पाहा काय होतो त्याचा अर्थ Description: हस्तरेषा आणि कुंडली याशिवाय आपल्या शरीरातील अनेक अवयव नशीब आणि भविष्याबद्दल संकेत देत असतात. आपल्या हातांची बोटं त्यापैकीच एक आहे. जाणून घेऊया बोटांमुळे भविष्य कसं माहिती होतं ते, त्याचा अर्थ...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola