Shani : पुढील पाच वर्ष शनिचा या राशीवर सर्वाधिक प्रभाव पडणार

Kumbh Rashi Shani Sade Sati Report : राशीचक्रात अकराव्या स्थानावर असलेल्या कुंभ या राशीची शनि साडेसाती सुरू आहे. यामुळे पुढील पाच वर्ष शनिचा कुंभ राशीवर सर्वाधिक प्रभाव असेल असे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे. 

Kumbh Rashi Shani Sade Sati Report, Next five years are crucial for this sign
Shani : पुढील पाच वर्ष शनिचा या राशीवर सर्वाधिक प्रभाव पडणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Shani : पुढील पाच वर्ष शनिचा या राशीवर सर्वाधिक प्रभाव पडणार
  • शनि साडेसातीचा त्रास कमी व्हावा यासाठी करायचे उपाय
  • कुंभ राशीचा शनि साडेसाती रिपोर्ट : 2023 ते 2033

Kumbh Rashi Shani Sade Sati Report, Saturn will have the most influence on this sign for the next five years, Next five years are crucial for this sign : राशीचक्रात अकराव्या स्थानावर असलेल्या कुंभ या राशीची शनि साडेसाती सुरू आहे. कुंभ ही वायू तत्वाची तिसरी आणि स्थिर अशी राशी आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. यामुळे पुढील पाच वर्ष शनिचा कुंभ राशीवर सर्वाधिक प्रभाव असेल असे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे. 

कुंभ राशीची माणसं बुद्धिमान, व्यावहारिक, चतुर, तर्कशास्त्राने चालणारी अशी असतात. समाजात स्वतःची ओळख निर्माण करतात. या मंडळींना विनाकरण कोणीही यांच्या कामात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. कुंभ राशीची माणसं इतरांच्या भल्यासाठी कायम पुढाकार घेताना दिसतात. 

सध्या कुंभ राशीच्या शनि साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. हा अडीच वर्षांचा कालावधी आहे. यानंतर कुंभ राशीच्या शनि साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा पण अडीच वर्षांचा असेल. 

कुंभ राशीच्या शनि साडेसातीचा दुसरा टप्पा 17 जानेवारी 2023 रोजी सुरू झाला आहे. हा टप्पा 29 मार्च 2025 पर्यंत चालेल. कुंभ राशीसाठी हा सर्वाधिक त्रासाचा काळ असू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

शनि साडेसातीचा त्रास कमी व्हावा यासाठी करायचे उपाय

  1. नियम कायदे पाळा. प्रामाणिकणे वागा. खरे बोला. 
  2. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अप्रामाणिकपणाला वा खोटेपणाला थारा देऊ नका.
  3. दर शनिवारी शनि देवाचे आणि भगवान हनुमानाचे दर्शन घ्या.
  4. यथाशक्ती गरजूंना दान करा.
  5. दर शनिवारी निळ्या रंगाची वस्त्रे परिधान करा. शनि देवाला निळ्या रंगाची फुले आणि तेल अर्पण करा. 

Chandra Grahan 2023: या दिवशी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण, या 5 राशींवर दिसणार चंद्रग्रहणाचा मोठा प्रभाव

Hanuman Chalisa : हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही संत तुलसीदासाने रचलेली हनुमान चालीसा

कुंभ राशीचा शनि साडेसाती रिपोर्ट : 2023 ते 2033

वर्ष साडेसाती चरण शनि गोचर राशी
2023 साडेसाती दुसरा कुंभ
2024 साडेसाती दुसरा कुंभ
2025 साडेसाती तिसरा कुंभ (29 मार्च पर्यंत नंतर मीन)
2026 साढ़े साती तिसरा मीन
2027 साडेसाती 3 जून पर्यंत तिसरा मीन (3 जून पर्यंत)
2027 साडेसाती नाही   मेष (3 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत)
2027 साडेसाती तिसरा मीन (20 ऑक्टोबर 2027 पासून)
2028 साडेसाती तिसरा मीन (23 फेब्रुवारी 2028 पर्यंत)
2028 शनि दशा नाही   मेष (23 फेब्रुवारी 2028 पासून )
2029 शनि दशा नाही   मेष (8 ऑगस्ट 2029 पर्यंत)
2029 शनि दशा नाही   वृषभ (8 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबर पर्यंत)
2029 शनि दशा नाही   मेष (5 ऑक्टोबर 2029 पासून)
2030 शनि दशा नाही   मेष (17 एप्रिल पर्यंत नंतर वृषभ)
2031 शनि दशा नाही   वृषभ
2032 शनि दशा नाही   वृषभ (31 मे पर्यंत नंतर मिथुन)
2033 शनि दशा नाही   मिथुन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी