Lakshmi Narayan Yoga: जूनमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग; या राशींचे चमकणार नशीब 

भविष्यात काय
Updated Jun 01, 2022 | 09:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lakshmi Narayan Yoga । बुध पहिल्यापासूनच वृषभ राशीमध्ये विराजमान आहे आणि शुक्र ग्रह देखील या राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, संवाद आणि हुशारीचा कारक मानला जातो.

Lakshmi Narayan Yoga in June, these zodiac signs luck will wake up 
जूनमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, या राशींचे चमकणार नशीब   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • बुध पहिल्यापासूनच वृषभ राशीमध्ये विराजमान आहे.
 • शुक्र ग्रह देखील या राशीमध्ये प्रवेश करत आहे.
 • १८ जून रोजी या दोन्ही ग्रहांचे वृषभ राशींमध्ये संक्रमण होईल.

Lakshmi Narayan Yoga । मुंबई : बुध पहिल्यापासूनच वृषभ राशीमध्ये विराजमान आहे आणि शुक्र ग्रह देखील या राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, संवाद आणि हुशारीचा कारक मानला जातो. तर शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, कीर्ती, सुख, कला, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो. लक्षणीय बाब म्हणजे बुध हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे, तर शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी मानला जातो. (Lakshmi Narayan Yoga in June, these zodiac signs luck will wake up). 

१८ जून रोजी या दोन्ही ग्रहांचे वृषभ राशींमध्ये संक्रमण होईल. या संक्रमणाने 'लक्ष्मी नारायण योग' तयार होईल आणि चार राशीच्या लोकांचे झोपलेले नशीब जागे हाईल अर्थात त्यांचे भाग्य उजळेल. 

अधिक वाचा : LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या आता काय आहे किंमत

मेष राशी 

 1. या राशीच्या लोकांना बुध आणि शुक्राच्या संक्रमणाचा लाभ मिळेल.
 2. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
 3. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील.
 4. परदेश प्रवासातून चांगले पैसे मिळतील.
 5. या काळात पैशाची कमतरता भासणार नाही.
 6. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही वेळ शुभ आहे.

वृषभ राशी 

 1. शुक्र राशीतच बुध आणि शुक्राचे संक्रमण होणार आहे.
 2. या संक्रमणामुळे तुमचे नशीब उजळण्याची शक्यता आहे.
 3. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
 4. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
 5. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी 

 1. व्यावसायिकांसाठी हे संक्रमण शुभ आहे.
 2. जीवनात सुख-समृद्धी येईल.
 3. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
 4. कठोर परिश्रमाने तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल.
 5. अचानक कुठूनतरी धनप्राप्ती होईल.
 6. माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल.

धनु राशी 

 1. या संक्रमणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना चांगले धन मिळण्याची शक्यता आहे.
 2. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते.
 3. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
 4. या काळात रखडलेली कामे पूर्ण होतील.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी