Astrology: शुक्र बुधासोबत राहिल्याने तयार होईल लक्ष्मी नारायण योग; देशाची आर्थिक स्थिती सुधारेल, पण महागाई वाढेल

Venus zodiac change । शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत शनिवारी आला आहे. १३ जुलैपर्यंत हा ग्रह या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा सुख-समृद्धी, भोग-विलास, दु:ख आणि खर्चाचा ग्रह मानला जातो.

Living with Mercury will create Lakshmi Narayan Yoga, know its effects
शुक्र बुधासोबत राहिल्याने तयार होईल लक्ष्मी नारायण योग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत शनिवारी आला आहे.
  • १३ जुलैपर्यंत हा ग्रह या राशीत राहील.
  • शुक्र हा सुख-समृद्धी, भोग-विलास, दु:ख आणि खर्चाचा ग्रह मानला जातो.

Venus zodiac change । मुंबई : शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत शनिवारी आला आहे. १३ जुलैपर्यंत हा ग्रह या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा सुख-समृद्धी, भोग-विलास, दु:ख आणि खर्चाचा ग्रह मानला जातो. तर बुध ग्रह हा गणित, कायदा, संवाद, वाणिज्य, त्वचा, औषध, लेखन, तर्कशास्त्र इत्यादींचा कारक मानला जातो. (Living with Mercury will create Lakshmi Narayan Yoga, know its effects). 

बुध ग्रहाची सूर्य आणि शुक्र यांच्याशी मित्रतेची भावना आहे. १५ जून रोजी सूर्य ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. जी बुध ग्रहाची समान राशी आहे. त्याचबरोबर शुक्र सध्या वृषभ राशीत आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्राच्या मिलनामुळे शेअर बाजार आणि इतर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात. बुध हा वाणीचा कारक ग्रह देखील मानला जातो.

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी करा ही ५ योगासने, लगेच मिळेल आराम

शुक्र आणि बुध करतात हे आर्थिक बदल 

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा लग्जरी जीवन आणि मनोरंजनाचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्राचे जाणकार सांगतात की, जेव्हा जेव्हा शुक्र राशी बदलतो. तेव्हा देशात वेळोवेळी मोठे आर्थिक बदल होत असतात. आता होत असलेल्या शुक्राच्या राशीत बदलामुळे व्यवसाय, सामाजिक वृत्ती इत्यादींमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. 

शुक्र आणि बुध एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योग देखील तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या कुंडलीत असा योग तयार होतो. ती व्यक्ती अचानक श्रीमंत होते. अशा व्यक्तींना त्यांच्या प्रतिभा, कला आणि ज्ञानाने संपत्ती आणि सन्मान प्राप्त होतो. लक्ष्मी नारायण योगामुळे व्यक्तीच्या धनात विशेष वाढ होते.

कामात गती येण्याचा योग

शुक्राच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार असल्याचे स्पष्टीकरण अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढू शकते तसेच पैशाची आवक वाढेल. व्यवसायात सुधारणा होईल. कामात गती येईल आणि बुद्धिमत्तेमुळे लोकांना फायदाही होईल.

लक्षणीय बाब म्हणजे या योगामुळे राजकारणात हुशार लोकांचे वर्चस्व वाढेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. धैर्य व संयम यामध्ये वाढ होईल. रोजगाराच्या संधी वाढतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमू लागेल. व्यवसायावर बुध ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव आहे. शुक्रासोबत बुधाची साथ असल्याने व्यवसायात मंदी राहील. फायदे वाढू लागतील. व्यवसायाचे कर्ज संपून प्रगती सुरू होईल.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी