Lunar Eclipse 2021: उद्या होणार शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, या 3 राशींनी घ्या अधिक काळजी 

Lunar Eclipse 2021:  यावेळी चंद्रग्रहण वृषभ राशीत होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे.

lunar eclipse 2021 biggest lunar eclipse of the century these three rashi should be careful
चंद्रग्रहणात या 3 राशींनी घ्या अधिक काळजी  
थोडं पण कामाचं
  • 19 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) होणार आहे.
  • हे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खूप महत्वाचे मानले जाते.
  • हे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत आहे,

नवी दिल्ली : 19 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) होणार आहे. हे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खूप महत्वाचे मानले जाते. वास्तविक, हे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत आहे, ज्याला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक महिना संपत आहे. (lunar eclipse 2021 biggest lunar eclipse of the century these three rashi should be careful)

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

हे देखील विशेष आहे कारण असे चंद्रग्रहण ५८० वर्षांनंतर होणार आहे. हे शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असल्याचे मानले जात आहे. हे चंद्रग्रहण गेल्या ५८० वर्षांतील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असेल. ग्रहणाचा कालावधी सुमारे साडेतीन तासांचा असेल. भारतात हे चंद्रग्रहण दुपारी 12:48 ते 04:17 मिनिटांपर्यंत राहील.

नाही लागणार सूतक 

हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे ग्रहण काळात कोणतेही सूतक होणार नाही. ज्योतिषांच्या मते या चंद्रग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण हे खंडग्रास म्हणजेच उपछाया ग्रहण आहे, त्यानंतर सूतक कालावधी होणार नाही. जेव्हा पूर्ण ग्रहण असते तेव्हाच ते लागू होते. जर संपूर्ण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण असेल तर ग्रहण कालावधी सुरू होण्याच्या ९ तास आधी सूतक सुरू होते.

चंद्रग्रहण कोणत्या राशीत होईल?

यावेळी वृषभ राशीत चंद्रग्रहण होणार आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल. याशिवाय कृतिका नक्षत्रात चंद्रग्रहण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कृतिका नक्षत्र हे सूर्याचे नक्षत्र मानले जाते. त्यामुळे ज्यांचा जन्म कृतिका नक्षत्रात झाला आहे, त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

19 नोव्हेंबर 2021 रोजी होणारे चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण मानले जाते. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.34 पासून ग्रहणाची सुरुवात होईल. सायंकाळी 5:33 वाजता संपेल. ग्रहण कालावधीचा एकूण कालावधी 5 तास 59 मिनिटे असेल.

या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

मेष- चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या राशीवरही दिसेल. पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. महत्त्वाची कामे घाईत करणे टाळा आणि या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.

वृषभ- यावेळी चंद्रग्रहण वृषभ राशीत होत आहे, त्यामुळे तुम्ही खूप सावध राहण्याची गरज आहे. वादांपासून दूर राहा, तणावापासून वाचाल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. राग, अहंकार आणि गोंधळापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

सिंह- कृतिका नक्षत्रात चंद्रग्रहण होत आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. सूर्य तुमच्या राशीचाही स्वामी आहे. त्यामुळे स्वभावात नम्रता आणि वाणीत गोडवा ठेवा. अधिकारांचा गैरवापर करू नका.

या गोष्टींची काळजी घ्या

या ग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नसला तरी चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करा आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी