Purnima Vrat 2023 Date :4 की 5 फेब्रुवारी, नेमकी कधी आहे माघ पौर्णिमा?

Purnima Vrat 2023 Date ,Muhurta or Muhurat Significance Importance History : पंचांगानुसार रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी स्नान, दान, जप याला प्रचंड महत्त्व हे. माघ Magh पौर्णिमेला मनापासून स्नान, दान, जप केल्याने पुण्य लाभते असे सांगतात.

Magh Purnima
माघ पौर्णिमा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 4 की 5 फेब्रुवारी नेमकी कधी आहे माघ पौर्णिमा?
  • पौर्णिमा या तिथीची सुरुवात नेमकी कधी होणार?
  • माघ पौर्णिमेला काय करतात?

Purnima Vrat 2023 Date, Muhurta or Muhurat Significance Importance History : पंचांगानुसार रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी स्नान, दान, जप याला प्रचंड महत्त्व आहे. माघ Magh पौर्णिमेला मनापासून स्नान, दान, जप केल्याने पुण्य लाभते असे सांगतात. 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

New Income Tax Slabs and Rates in marathi: 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Agriculture Budget 2023 : मोदींनी केले शेतकऱ्यांना खुश, पाहा काय दिले शेतीसाठी 

पौर्णिमा या तिथीची सुरुवात शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9 वाजून 29 मिनिटांनी होईल आणि समाप्ती रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी होईल. माघ पौर्णिमेचे व्रत रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी करावे असे पंचांगाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

माघ महिन्यात देव पृथ्वीवर येतात. प्रयाग येथे स्नान, दान, जप करतात असे सांगतात. यामुळेच माघ महिन्यातील पौर्णिमेला अर्थात माघ पौर्णिमेला पवित्र गंगा नदीत अथवा आपण ज्या भागात वास्तव्यास आहात त्या भागातील नदीत सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करावे. सूर्य मंत्राचे पठण करावे. सूर्याला नमस्कार करावा. यानंतर घरी येऊन देवी देवतांची मनापासून पूजा करावी. आपल्या कुलदेवतेचे, विष्णू देवाचे, लक्ष्मी मातेचे नामस्मरण करावे. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू नाम जपावे. अनेकजण माघ पौर्णिमेला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी अथवा तिथी समाप्तीनंतर उपवास सोडतात. 

पौर्णिमेच्या दिवशी यथाशक्ती गरजूंना दान (अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा पैशांच्या स्वरुपातील दान) करावे. गायीला अन्न द्यावे. यामुळेही पुण्य लाभते असे सांगतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी