मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

भविष्यात काय
Updated May 15, 2019 | 07:51 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Bad effect of Mangal: अनेक तरूण-तरूणींचं लग्न न जमण्याचं अनेकदा एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे मुलाला-मुलीला मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाचं एक वेगळंच महत्त्व पत्रिकेत सांगितलं जातं. पाहा मंगळावरील उपाय.

Hanuman
मंगळाचा त्रास कमी करण्यासाठीचे उपाय  |  फोटो सौजन्य: Instagram

मंगळाचा त्रास हा शनीच्या साडेसाती पेक्षा काही कमी नसतो. या दोन्ही त्रासांमध्ये फक्त अंतर एकाच गोष्टीचं आहे, ते म्हणजे शनीच्या साडेसातीचा प्रभाव फक्त त्याच व्यक्तीवर होतो ज्याला साडेसाती आहे. मात्र ‘मंगळ’ स्वत:च खूप तापट असल्यामुळे मंगळाचा त्रास असलेला व्यक्ती रागीट होतो आणि त्यामुळे त्याचे नातेसंबंध, मित्र, सहकारी दूर होऊ शकतात. एवढंच नव्हे तर ती व्यक्ती स्वत:च स्वत:ची शत्रू बनते.

मंगळ आपल्या वाईट प्रभावामुळे प्रभावित व्यक्तीचे अनेक शत्रू निर्माण करतो, त्याला वाईट व्यसनांकडे वळवतो, स्वभाव खूप हट्टी बनवतो, तसंच मंगळामुळे आपल्याच लोकांपासून व्यक्ती दूर जावू लागते. जर आपल्या आसपास कुणी मंगळाच्या प्रभावानं ग्रासलेली व्यक्ती असेल तर त्यासाठी हे काही खास उपाय आहेत. ज्यामुळे मंगळाचा त्रास कमी होईल.

मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी मंगळवारी करा खालील उपाय

  1. ज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे, अशा व्यक्तीनं नारळाचं पाणी पिणं खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीमधील राग कमी होतो.
  2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमतांचं शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.
  3. बुंदीचे लाडू आपल्या हातानं तयार करावे आणि त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.
  4. विड्याच्या पानावर काथ लावावा आणि असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.
  5. दररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.
  6. मोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.
  7. मंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.
  8. असं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते.

ज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही. अशा तरूणांनी हे उपाय करून बघण्यास काहीच हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्तीही जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी