Marathi New Year 2022 | मुंबई : चैत्र शुध्द प्रतिपदेपासून म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. याच दिवशी सर्वत्र गुडीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यावर्षी ही तारीख २ एप्रिल २०२२ रोजी शनिवारी आहे. त्यामुळे यंदाचे मराठी नववर्ष इंग्रजी तारखेनुसार २ एप्रिलपासून सुरू होईल. लक्षणीय बाब म्हणजे येणारे नवीन वर्ष सर्व राशींसाठी काही ना काही खास घेऊन येणारे आहे. चला तर म कायवल्ली हीलिंग सेंटरच्या संस्थापक आणि टॅरो कार्ड रीडर आचार्य रणमीत कौर यांच्याकडून जाणून घेऊया आगामी वर्षाचे राशीभविष्य. (marathi New Year 2022 Horoscope In the next 1 year, people in these 3 zodiac signs will get a lot of money).
अधिक वाचा : थेट पुतीनशी बोलून नरेंद्र मोदी संपवू शकतात युद्ध, पण..
टॉवर कार्ड असे संकेत देत आहे की या वर्षी व्यवसाय आणि नातेसंबंधातील विश्वास कमी झाल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. लक्षणीय बाब म्हणजे उत्पन्न जास्त असले तरी वाढत्या खर्चामुळे खचून न जाण्यासाठी आधीच पूर्वतयारी करणे योग्य राहील. तसेच वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील. शिक्षण संबंधित क्षेत्रात संघर्ष करावा लागेल. जास्त ताण, नैराश्य आणि धावपळ यामुळे हृदय, रक्तदाब, हार्मोनल तसेच पोटाशी संबंधित समस्या जाणवतील. वर्षातील शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी सुखदायी असणार आहेत, कारण त्या दिवसांत अडचणी दूर होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. भगवान शंकराची आराधना करा आणि रोज गाईला ताजा हिरवा चारा खायला घाला.
टू ऑफ पेंटॅकल्स कार्ड असे दर्शवत आहे की, या वर्षी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या थकवा जाणवेल. तुमची कोणतीही गुप्त माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा. उत्पन्न वाढेल पण खर्चात देखील तितकीच वाढ होईल. या वर्षी स्थलांतरीत होण्याचा योग आहे, तुम्ही प्रवासासाठी बाहेर जाऊ शकता किंवा वास्तव्यासाठी देखील इतर ठिकाणी जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी देखील बदल होण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल पण वर्षाच्या अखेरीस. आगामी वर्षात तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल.
अधिक वाचा : हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन
एस ऑफ पॅटेंकल्स कार्ड हे वर्ष आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे असल्याचे संकेत देत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष लाभ मिळेल. कोणतेही प्रेमप्रकरण तुमच्या आयुष्यात वेगळा रंग भरेल. कुटुंबातील सदस्य आणखी जवळ येतील तसेच घरात कोणताही कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये नशीबाची चांगली साथ राहील. यावर्षी प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. हाडांची समस्या, निद्रानाश, मासिक पाळीचे आजार, पित्तदोष आणि त्वचारोग यांसारख्या समस्या जाणवतील.
फाइव्ह ऑफ वॅंड्स हे कार्ड असे दर्शवत आहे की, या वर्षातील पहिले सहा महिने तुमच्या कार्यक्षेत्रासाठी अडचणीचे आहेत कारण वादविवाद होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर दिसून येईल. तुमचे विरोधक विविध प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वर्षाच्या अखेरीस आर्थिक समस्या दूर होतील आणि नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वादामुळे वैवाहित जीवनात अडचणी राहतील. या वर्षी अपघात झाल्यामुळे शरीराच्या खालच्या भागात हृदय आणि गुप्तांगाच्या आजारांनी त्रस्त व्हाल. त्यामुळे दररोज हनुमान चालिसा वाचा आणि वेळेवर वैद्यकिय सल्ला घ्या.
अधिक वाचा : कधीपासून सुरू झाला April Fool जाणून घ्या
पेज ऑफ वॅंडस कार्ड असे सूचवते की, या वर्षी तुमचा उत्साह शिगेला पोहचलेला असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही कौतुकास पात्र असाल. चांगल्या आर्थिक लाभासोबतच नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन देखील होईल. काही मनोरंजक बातम्या मिळाल्याने तुम्ही खुश व्हाल तसेच तुमच्या पाल्याशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळेल. प्रवासासाठी हे वर्ष उत्तम असेल. वैवाहित जीवनात प्रेमाचा एक नवा रंग बहरू लागेल. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि श्वसन, गुद्दवार संबंधित आजारांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
सेवन ऑफ वॅंडस असे म्हणते की या वर्षात कामाच्या ठिकाणी विरोधकांमुळे मानसिक त्रास होईल. खासकरून मे आणि जून महिन्यात सावधान राहणे गरजेचे आहे. कौटुंबिक वाद आणि जोडीदाराच्या वागण्यात थोडा बदल पाहायला मिळेल. आई किंवा मुलांच्या आरोग्याबाबत काळजीने धावपळ होईल. हे वर्ष स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वर्गासाठी खास असणार आहे. माता दुर्गेची पूजा करा आणि अग्नि देवतेला पंचधान दान करा.
अधिक वाचा : हसवणारा, गुदगुल्या करणारा शर्माजी नमकीन
एस ऑफ सोर्ड कार्ड या वर्षात जुन्या अडचणी संपवण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत देत आहे. गडबडीत केलेल्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उत्तरार्धात विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर राहील मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. लक्षणीय बाब म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये जुलै महिन्यानंतर यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सावध राहण्याची गरज आहे. पचन आणि जननेंद्रियांशी संबंधित आजारामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल.
एस ऑफ कप्स कार्डनुसार या आगामी मराठी नववर्षात जुन्या समस्या दूर होतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमात यश मिळण्यासोबतच घरात देखील आनंदाचे वातावरण राहील. यावर्षी नशीबाची चांगली साथ राहील. जर कोण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्याला यामध्ये यश मिळेल. हृदय, सांधेदुखी, मायग्रेन, ल्युकोरिया इत्यादी आजारांबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
द वर्ल्ड कार्ड संकेत देत आहे की, या वर्षी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाल्याने कार्यक्षेत्रात घवघवीत यश मिळेल. जुन्या समस्यांतून सुटका होईल आणि समृध्द भविष्याकडे पाऊले पडतील. वैवाहिक जीवनात थोडी नाराजी राहील, परंतु ऑक्टोबरनंतर वैवाहिक जीवन सुखकर होईल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. या वर्षी तुम्ही स्वत:ला निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवाल, त्यामुळे आरोग्य उत्तम राहील.
अधिक वाचा : इंधन दरवाढीच्या विरोध काॅंग्रेस रस्त्यावर
द फूल कार्ड तुम्हाला नवीन संधीसाठी सावध राहण्याचे संकेत देते. तुमच्या रूढीवादी विचारसरणीमुळे एखादी सुवर्णसंधी तुमच्या हातातून निसटू शकते. आर्थिक लाभ असताना देखील खर्चाने त्रस्त असाल. आई आणि पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात थोडी उदासीनता अनुभवता येईल. चांगल्या परिश्रमानंतर स्पर्धा परीक्षामंध्ये यश मिळेल. कमी रक्तदाब, नैराश्य, अस्वस्थता, त्वचारोग अशा समस्या होण्याची संभावना आहे.
कोणताही करार संपुष्टात आल्याने हे वर्ष अस्वस्थ होणार असल्याचे डेथ कार्ड सूचित करत आहे. आर्थिकदृष्ट्या वर्षाचा पूर्वार्ध काहीसा कठीण जाईल, पण ऑक्टोबरपासून आर्थिक समस्या दूर होतील. ठिकाण बदलण्याची किंवा प्रवासाची शक्यताही वर्तवली जात आहे. वैवाहिक संबंध किंवा प्रेम संबंधामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळताना दिसत नाही. उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि श्वास, गुदद्वार, संबंधित आजार डोक वर काढतील.
टेन ऑफ कप कार्ड दर्शवत आहे की यावर्षी विरोधक मैदानात सक्रिय असतील परंतु तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवण्यात यश येईल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृध्द व्हाल आमि कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष चांगले आहे. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. लक्षणीय बाब म्हणजे मुलांमुळे खर्चात वाढ होऊ शकते. या वर्षी श्री कृष्ण-रूक्मणीची पूजा करा आणि 'जय कृष्ण-रूक्मणी प्रेमसागर' हे वाक्य दररोज कोणत्याही पेपरवक किंवा सोशल मीडियावर लिहा.